Prakash Ambedkar sakal
मुंबई

Prakash Ambedkar : हेमंत करकरेंवर गोळ्या झाडल्या कोणी? ; प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना सवाल

‘‘मुंबईवर २६/११ला जो हल्ला झाला, त्यात ज्या गोळ्या पोलिस अधिकारी हेमंत करकरे आणि साळसकर यांच्या शरीरात मिळाल्या, त्या जर कसाब आणि अबू इस्माईल यांच्या बंदुकीतील नसतील, तर तो तिसरा कोण आहे, हा प्रश्‍न वरिष्ठ वकील म्हणून उज्ज्वल निकम यांना पडलाच पाहिजे होता,’

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ‘‘मुंबईवर २६/११ला जो हल्ला झाला, त्यात ज्या गोळ्या पोलिस अधिकारी हेमंत करकरे आणि साळसकर यांच्या शरीरात मिळाल्या, त्या जर कसाब आणि अबू इस्माईल यांच्या बंदुकीतील नसतील, तर तो तिसरा कोण आहे, हा प्रश्‍न वरिष्ठ वकील म्हणून उज्ज्वल निकम यांना पडलाच पाहिजे होता,’’ असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी व्यक्त केले.

पत्रकार परिषदेत बोलताना आंबेडकर म्हणाले की, उज्ज्वल निकम यांना माझे दोन प्रश्न आहेत. निवडणुकीच्या आधी त्यांनी उत्तर द्यावे, असे त्यांना आव्हान आहे. मुंबईवर हल्ला झाला ते खरे आहे. त्याला पाकिस्तानने रसद पुरवली याबाबत दुमत नाही. पण या घटनेच्याआड कोणीतरी दुसरी घटना घडवून आणलीय का, याचा खुलासा निकम यांनी करावा. पोलिस अधिकाऱ्यांवर झाडलेल्या गोळ्या ज्यावेळी जुळल्या झाल्या नाहीत, तेव्हा त्या कोणत्या शस्त्रातील होत्या? याबाबत त्यांनी अतिरिक्त चौकशी का केली नाही. न्यायालयाच्या नजरेस त्यांनी ही बाब का आणून दिली नाही, याचा खुलासा निकम करतील अशी अपेक्षा करतो.

चौकशी का केली नाही’

‘‘माझे पुतळे कोणाला जाळायचे असतील त्यांनी जाळावेत. देशद्रोही घोषित करावे, मला फरक पडत नाही. पण पोलिस अधिकाऱ्यांवर झाडलेल्या गोळ्या कोणत्या शस्त्रातील आहेत, याची चौकशी अधिकाऱ्यामार्फत किंवा न्यायालयामार्फत का केली नाही, या माझ्या प्रश्नाचे उत्तर निकम यांनी द्यावे,’’ असे आव्हान आंबेडकर यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हेल्मेटमुळे वाचला जीव, 20 दिवसांनी रचला सापाने हत्या करण्याचा कट; मेरठ प्रकरणात नवा खुलासा

Mulshi Crime : मुळशीतील मरगळे कुटुंबातील पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा; शेतीच्या रस्त्याच्या वादातून केला होता खून

Konkan Rock Art : कोकणात सापडला 3 हजारहून अधिक कातळशिल्पांचा खजिना; एकशिंगी गेंड्याचं रहस्य काय? अश्मयुगीन मानवाचा काळ अनुभवता येणार!

मोठी राजकीय घडामोड! ठाकरे गटातील ६ बंडखोर खासदारांचे शिंदे सेनेत विलिनीकरण अधिकृत, लोकसभा सचिवालयाचा निर्णय

ENG vs IND: एकिकडे निवृत्तीची चर्चा, तर दुसरीकडे गंभीर-रोहितच्या लॉर्ड्सच्या बाल्कनीत गप्पा; Video तुफान व्हायरल

SCROLL FOR NEXT