मुंबई

दिल्ली आणि महाराष्ट्राच्या लढाईत प्रताप सरनाईकचा 'तानाजी' झाला; सिद्धिविनायकाच्या चरणी सरनाईक लिन

सुमित बागुल

मुंबई : टॉप्स ग्रुप प्रकरणी प्रताप सरनाईक यांना ED कडून तब्बल ३ समन्स पाठवण्यात आलेत. त्यानंतर आज प्रताप सरनाईक यांनी मुंबईतील सिद्धिविनायकाच्या चरणी नतमस्तक होतं देवाकडे गाऱ्हाणं घातलं आहे. जगावरील कोरोनाचं संकट, देशातील शेतकऱ्यांवरील संकट आणि सरनाईक कुटुंबावरील ईडा पीडा टळो अशा प्रकारचं गाऱ्हाणं बाप्पाला घातलं आहे असं प्रताप सरनाईक म्हणालेत. 

क्वारंटाईनमध्ये असल्या कारणाने माध्यमांना भेटू शकलो नाही

गेले अनेक दिवस क्वारंटाईनमध्ये असल्या कारणाने माध्यमांना भेटू शकलो नाही. दरम्यानच्या काळात ED कडून अनेक नोटीसेस आल्या आहेत. त्यांना लेखी उत्तरे देखील पाठवली आहेत. ED ही भारतातील मोठी संस्था असून भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे ED ने बाहेर काढली आहेत. त्यामुळे त्या संस्थेला मदत करणे आणि त्या संस्थेच्या प्रत्येक कामामध्ये त्यांना सहकार्य करणे हीच प्रताप सरनाईक यांची भूमिका असल्याचेही ते म्हणालेत. 

प्रताप सरनाईक प्रत्येक प्रश्नाचे भविष्यात उत्तर देईल

गेल्या काही काळात जे धाडसत्र सुरु आहे, त्यामध्ये महाराष्ट्र आणि दिल्लीची जी लढाई सुरु आहे त्याबाबत प्रताप सरनाईक प्रत्येक प्रश्नाचे भविष्यात उत्तर देईन . मात्र दिल्ली आणि महाराष्ट्राच्या लढाईत प्रताप सरनाईकचा तानाजी झाला आहे. मात्र, तेंव्हाचे तानाजी मालुसरे १६ व्य शतकातील होते आताचे विसाव्या शतकातील आहेत. त्यावेळी तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले होते. आता प्रताप सरनाईक सर्व गोष्टींना सक्षमपणे सामोरं जाईल, असंही सरनाईक म्हणालेत. 

प्रताप सरनाईक यांची संपत्ती सातशे ते आठशे कोटीं?  

माझी संपत्ती जर सातशे ते आठशे कोटींनी वाढली असेल तर मला आनंद आहे, असं सरनाईक म्हणालेत. दरम्यान सरनाईक यांनी काही नावे देखील घेतली आहेत. ज्यामध्ये भाजपचे मंगलप्रभात लोढा, भाजपचे पराग शाह, सुधाकर शेट्टी, उत्तर प्रदेशातून आलेले ठाकूर आणि तिवारी यांच्या संपत्तीबाबत काय असं सरनाईक म्हणालेत. प्रताप सरनाईक यांनी पश्चिम भारतातून आलेले अर्णब गोस्वामी यांची प्रॉपर्टी आता तब्बल १२०० कोटींच्या घरात आहे किंवा हिमाचलमधून आलेल्या १६ वर्षाच्या मुलीने आता करोडोंचे मुंबईत फ्लॅट्स आणि ऑफिसेस घेतलेत त्यांची तुम्ही चौकशी केली का असा सवाल विचारला आहे. 

पुढे प्रताप सरनाईक म्हणालेत की, मला अभिमान आहे की मी रिक्षा चालवली, ऑम्लेटची गाडी देखील चालवली आहे , मात्र मी प्रत्येक कायद्याचं पालन करून इथे पोहोचलो आहे. केंद्राच्या हातात ED आणि इन्कम टॅक्स सारखी संस्था आहे. माझी प्रत्येक चौकशीला सामोरं जाण्याची माझी तयारी आहे.        

pratap sarnaik and vihang sarnaik at siddhivinayak ready to co operate all investigation says sarnaik

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suresh Jain Video : राजकारणातून संन्यास घेतल्यानंतर सुरेश जैन यांचा भाजपला पाठिंबा; म्हणाले...

Devendra Fadnavis : मोदी गरिबांचे मसिहा, काँग्रेसने स्वतःची गरिबी हटविली; देवेंद्र फडणवीस यांची टीका

Afghanistan Floods : अफगाणिस्तानमध्ये महापूर, ३०० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू; अनेक घरं गेली वाहून

PM Narendra Modi : ''पाकिस्तानकडून कुणीही अणुबाँब खरेदी करत नाही'', मोदींचा काँग्रेसला टोला, म्हणाले...

Shirpur Jain News : पार्श्वनाथच्या मंदिरात पुन्हा तुंबळ हाणामारी, दोन जण जखमी

SCROLL FOR NEXT