Pravin Darekar Mumbai Bank Sakal
मुंबई

नव्या सरकारचा प्रवीण दरेकरांना फायदा?; मुंबै बँकेच्या अध्यक्षपदी बिनविरोध

मविआच्या सरकारमध्ये ही बँक अजित पवार आणि मिलिंद नार्वेकरांच्या ताब्यात होती.

सकाळ डिजिटल टीम

मुंबै बँकेच्या अध्यक्षपदी भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे यांची निवड झाली आहे. नवं सरकार आल्यावर बँकेतही सत्तांतर झाल्याचं या निमित्ताने दिसून आलं.

सहा महिन्यांपूर्वी दरेकर यांना धक्का देत महाविकास आघाडीने ही बँक ताब्यात घेतली होती. मात्र आता शिंदे फडणवीस सरकार येताच पुन्हा सत्तांतर झालं आहे. त्यामुळे या नव्या सरकारचा फायदा प्रवीण दरेकरांना झाला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

महाविकास आघाडीची सत्ता असतानाच मुंबै बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर यांनी सूत्रे हलवत भाजपाला धक्का दिला होता. मात्र आता अवघ्या सहा महिन्यांतच दरेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Chairman Election : 'वडिलांच्या कष्टाची परतफेड म्हणून मुलाला अध्यक्ष करा'; शशिकांत पाटील यांच्यासाठी चुयेकरांच्या स्मारकासमोर ग्रामस्थांचे साकडे

Sangli Farmer Loan Waiver : 30 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर 204 कोटींची कर्जमाफीची रक्कम जमा; चौथ्या यादीत 8 हजार जणांचा समावेश, 'आधार' प्रमाणिकरण पूर्ण करणे गरजेचे!

‘बिखरेगा जलवा’! म्हणत श्रद्धा कपूरने 'ईठा' सिनेमातील क्लिप केली शेअर! नाना पाटेकरांची सुद्धा महत्त्वाची भूमिका?

US Fed Rate: अमेरिकन फेडचा व्याजदराबाबत निर्णय! शेअर बाजारापासून सोन्या-चांदीपर्यंत काय परिणाम होणार?

Latest Marathi News Update : कुणाल मार्केट इमारतीत भीषण आग; 17 दुचाकी, 4 चारचाकी जळून खाक

SCROLL FOR NEXT