Mumbai Bank Scam | Pravin Darekar News sakal media
मुंबई

प्रवीण दरेकरांना मुंबै बँक प्रकरण भोवणार? पोलीस स्टेशनबाहेर कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

सकाळ डिजिटल टीम

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना मुंबै बँक घोटाळ्या प्रकरणात पोलिसांनी नोटीस दिली होती. त्यानंतर दरेकरांना आज पोलिसांनी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार दरेकर पोलीस ठाण्यात पोहोचले आहेत. मात्र, भाजपच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. दरेकरांच्या बाजूने घोषणाबाजी सुरू आहे.

राज्यातील मविआ सरकारच्या नेत्यांना केंद्रीय यंत्रणा रडारवर घेत असल्याचा आरोप होत आहे. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी ही राजकीय खेळी असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत.

प्रवीण दरेकरांनी मजूर कोट्यातून अर्ज दाखल केला होता. ते ज्या त्या मजूर संस्थेतून निवडून गेले, त्या संस्थेचं पदही बोगस असल्याचे आरोप झाले. यानंतर सहकार खात्याने दरेकरांना नोटीस पाठवली होती. तसेच तक्रार दाखल करण्यात आल्याने आता दरेकरांना रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये हजर व्हायचं आहे.

प्रवीण दरेकर यांची बँकेवर संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली होती. मुंबै बँकेच्या निवडणुकीत प्रवीण दरेकर मजूर आणि नागरी सहकार बँक अशा दोन्ही प्रवर्गातून निवडून आले होते. परंतु सहकार विभागाने प्रवीण दरेकर यांना मजूर म्हणून अपात्र ठरवले. आम आदमी पार्टीच्या वतीने धनंजय शिंदे यांनी प्रवीण दरेकर यांच्याविरोधात तक्रार नोंदवली होती. मजूर नसतानाही याच प्रवर्गातून मुंबै बँकेच्या संचालकपदाची निवडणूक लढवून सुमारे २० वर्षे सरकारची फसवणूक केल्याचा आरोप दरेकर यांच्यावर आहे.

या प्रकरणी आता मुंबई पोलिसांनी भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना ही नोटीस बजावण्यात आली. यानंतर त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे. त्यासाठी दरेकरांना आता पोलीस ठाण्यात हजर व्हावं लागलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT