Pretending to be the police, 6 People entered the cafe owner's house and looted 25 lakhs in Mumbai Esakal
मुंबई

Mumbai Police: मुंबईत स्पेशल 26! पोलीस असल्याचा बनाव करत कॅफे मालकाच्या घरात घुसले अन् 25 लाख लुटले

Mumbai Crime News: तपासादरम्यान, फॉरेन्सिक तज्ञांनी गुन्ह्याचे ठिकाण आणि सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावेळी त्यांना असे आढळले की, काही पोलीसही या गुन्ह्याचा भाग आहेत.

आशुतोष मसगौंडे

गुन्हे शाखेचे पोलीस असल्याचा दावा करत सहा जणांनी मुंबईतील सायन भागातील एका कॅफे मालकाच्या घरात घुसून २५ लाख रुपये चोरल्याचे गुरुवारी एका अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान या आरोपींपैकी चौघांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

शहरातील माटुंगा परिसरात लोकप्रिय कॅफे चालवणाऱ्या फिर्यादीने पोलिसांना सांगितले की, मंगळवारी सायन हॉस्पिटलजवळ सहा जण मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस असल्याचे सांगत त्यांच्या घरी घुसले. त्यांनी फिर्यादीच्या निवासस्थानाची झडती घेतली आणि त्यांची ओळखपत्रेही दाखविल्याची घटना सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली होती. (Pretending to be the police, 6 People entered the cafe owner's house and looted 25 lakhs in Mumbai)

यावेळी आरोपी फिर्यादीला म्हणाले की, "आम्ही निवडणूक ड्युटीवर आहोत आणि लोकसभा निवडणुकीमध्ये वाटण्यासाठी तुमच्या घरी पैसे ठेवल्याची माहिती मिळाली आहे."

या आरोपींनी फिर्यादीच्या घराची झडती घेतल्यानंतर त्यांना ड्रॉवरमध्ये 25 लाख रुपये सापडले जे नायक यांनी त्यांना माटुंगा पूर्व येथील कॅफे म्हैसूर रेस्टॉरंटची कमाई असल्याचे सांगितले परंतु आरोपींनी ही रोकड काळा पैसा असल्याचा दावा केला. आणि प्रकरण मिटवण्यासाठी 2 कोटी रुपयांची मागणी केली.

जेव्हा फिर्यादी नायक यांनी सांगितले की, त्यांच्याकडे इतके पैसे नाहीत, तेव्हा आरोपींनी नायक यांना धमकावले आणि पैसे घेऊन निघून गेले, असे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान या संपूर्ण प्रकरणात काहीतरी काळबेरं असल्याची शंका आल्यानंतर फिर्यादी नायक यांनी संपर्क साधला. व विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवला.

तपासादरम्यान, फॉरेन्सिक तज्ञांनी गुन्ह्याचे ठिकाण आणि सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावेळी त्यांना असे आढळले की, काही पोलीसही या गुन्ह्याचा भाग आहेत.

आरोपींनी वापरलेल्या वाहनाचाही शोध घेण्यात येत असून गुन्ह्यात सहभागी असलेल्या उर्वरित आरोपींना अटक करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT