मुंबई

शेवग्याच्या शेंगांचा भाव उतरला 

सकाळ वृत्तसेवा

पाली : शेवग्याच्या शेंगांची आवक वाढल्याने गेल्या पंधरवड्याच्या तुलनेत त्याचे भाव निम्म्याने उतरले आहेत. आता पाच रुपयाला एक शेंग विकण्यात येत आहे. पाली बाजारात चार शेंगांची एक जुडी विकण्यात येत आहे. 

गेल्या पंधरवड्यात शेवग्याचा भाव वधारला होता. एक शेंग तब्बल 10 रुपयांत विकण्यात येत होती. त्यानंतरही खवय्ये ती खरेदी करत होते. आता भाव काही प्रमाणत उतरले आहेत. 

मागील वर्षी या हंगामात 4 ते 5 शेंगांची जुडी 10 ते 15 रुपयांना किंवा त्याहीपेक्षा कमी दराने मिळत होती. यंदा वातावरणातील बदलांमुळे या झाडांना फार कमी बहर आला आहे. त्यामुळे आवक कमी आहे. 
पुणे आणि वाशी मंडईतही त्यांची आवक कमी आहे. त्यामुळे घाऊक बाजारात किंमती जास्त आहेत. 

यंदा शेवग्याच्या शेंगांचे उत्पादन कमी आहे. घाऊक बाजारातच त्यांचा भाव अधिक आहे. त्यामुळे आपोआप किंमती वाढल्या आहेत. त्यानंतरही ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी होत आहे. 
- उमेश मढवी, विक्रेते 

शेवग्याच्या शेंगा आरोग्यवर्धक आणि स्वादिष्ट असतात. त्याबरोबरच भाजी, कडधान्य, वरण आणि सुक्‍या आणि ओल्या मासळीच्या कलवणात टाकल्यास जेवणाची चव वाढते. त्यामुळे त्या आवडतात. यंदा त्यांची आवक कमी आहे. 
- लता माळी, गृहिणी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Ambajogai Crime : अडीच वर्षाच्या चिमुरडीवर १३ वर्षाचा अल्पवयीन मुलाचा अत्याचार; मुलावर गुन्हा दाखल

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

SCROLL FOR NEXT