PM Narendra Modi and Lata Mangeshkar Sakal
मुंबई

"अनेक दशकांनंतर पहिलं..."; लतादिदींच्या आठवणीने पंतप्रधान मोदी भावूक

देशाचा ७५ वर्षांचा प्रवास हा लतादिदींच्या सुरांशी जोडलेला होता, अशी भावनाही पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रविवारी पहिल्या लता दिनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. यावेळी त्यांनी लता मंगेशकर यांच्या राष्ट्रउभारणीतल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पंतप्रधान मोदी यांनी लता मंगेशकर यांना आपली मोठी बहीण मानलं होतं. लता दिदींचं वयाच्या ९२ व्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात निधन झालं.

त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार यावर्षीपासून देण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. हा पुरस्कार स्विकारत असताना केलेल्या भाषणादरम्यान ते म्हणाले, लता दिदी फक्त सुरांची महाराणीच नव्हत्या तर त्या माझ्या मोठ्या बहीणही होत्या. त्यांनी अनेक पिढ्यांना प्रेम आणि करुणेची भाषा शिकवली. त्यांनी माझ्यावर मोठ्या बहिणीसारखं प्रेम केलं हे मी माझं भाग्य मानतो. अनेक दशकांनंतर हे पहिलं रक्षाबंधन असेल जेव्हा लतादिदी सोबत नसतील.

मोदी पुढे म्हणाले, "लता मंगेशकर यांचा आवाज ८० वर्षांहूनही अधिक काळ श्रोत्यांच्या मनावर रुंजी घालत आहे अगदी ग्रामोफोन, सीडी-डीव्हीडीच्या काळापासून डिजीटल म्युझिक अॅप्सच्या काळापर्यंत. लता दिदींनी पाच पिढ्यांना आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध केलं आणि भारताची मान उंचावली. देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना त्यांचा हा प्रवास थांबला. त्यांनी अगदी स्वातंत्र्यापूर्वीपासून भारताला आवाज दिला. देशाचा ७५ वर्षांचा प्रवास हा त्यांच्या सुरांशी जोडलेला होता. आपला संपूर्ण देश मंगेशकर कुटुंबीयांच्या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. गायनासोबतच राष्ट्रभक्तीही त्यांच्या वडिलांमुळे त्यांच्यात होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदी 'लेम डक पंतप्रधान'; विद्यार्थ्यांना झालेल्या लाठीचार्चवरून राज ठाकरेंचा घणाघात...

IND vs ZIM : फक्त 11 षटकार... अन् वैभव सूर्यवंशी थेट इतिहासाच्या शिखरावर; जगात कुणालाही जमलं नाही ते करणार?

Live Updates Marathi : पंतप्रधान मोदींच्या घरासमोर विरोधकांचा मोर्चा, राहुल गांधीही उपस्थित

Railway Ticket Scam: तिकीट दलालीवर 'आरपीएफ'चा वचक! १० कोटींहून अधिक किमतीची तिकिटे जप्त; शेकडो जणांवर कारवाई

CBSE New Rule: 'तिसरी भाषा' नापास? बोर्डाचं सर्टिफिकेट अडकणार! १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी नवा नियम

SCROLL FOR NEXT