make India developed nation congress Prithviraj Chavan politics marathi news Esakal
मुंबई

Prithviraj Chavan: "बोरवणकरांचा गैरसमज झाला असावा"; आधीच्या विधानावरुन पृथ्वीराज चव्हाणांचा यूटर्न

बोरवणकरांना पोस्टिंग नाकारल्याच्या मुद्द्यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा भाष्य केलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांच्या आरोपांवर भाष्य करताना आपल्या विधानावरुन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आता माघार घेतली आहे. बोरवणकर यांना पोस्टिंग देता आली नाही कारण आघाडी धर्माचं पालन करायचं होतं असं सांगत त्यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला होता. (Prithviraj Chavan u turn on allegations of former IPS Meera Borvankar)

त्यांचा गैरसमज झाला असावा

"जमीन हस्तांतरणाला विरोध केल्यानं आपल्याला पोस्टिंग मिळाली नसल्याचा उल्लेख बोरवणकर यांनी पुस्तकात केला, पण तसं काही नाही. त्यावेळी त्यांना जी हवी ती पोस्ट नव्हती त्यामुळं त्यांचा गैरसमज झाला असावा. मला यातली जास्त माहिती नाही, पण वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये खूप मोठी प्रकिया असते. त्यामुळं त्यांचा माझ्याबद्दल गैरसमज झाला असावा," असं मीडियाशी बोलताना चव्हाण यांनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)

राष्ट्रवादीचा बोरवणकर यांना विरोध

दरम्यान, बोरवणकर यांच्या पुस्तकाच्या संदर्भानं सध्याचे उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांच्यावर पुण्यातील येरवडा पोलीस स्टेशनच्या भूखंड हस्तांतराबाबत गंभीर आरोप करण्यात आले होते.

यासंबंधी चर्चा सुरु झाल्यानतंर पहिल्यांदा यावर भाष्य करताना चव्हाण म्हणाले होते की, "बोरवणकर यांना सीआयडीमध्ये नियुक्ती हवी होती. पण तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी याला विरोध केला होता. म्हणजेच राष्ट्रवादीचा विरोध असल्यानं बोरवणकरांना हवी ती पोस्टिंग देता आली नव्हती" (Marathi Tajya Batmya)

बोरवणकरांचे गंभीर आरोप

तसेच मीरा बोरवणकर यांनी या प्रकरणावर पत्रकार परिषदेत सविस्तर भाष्य केलं होतं. यात त्यांनी आरोप केला होता की, "मी येरवडा पोलीस स्टेशनच्या जागा हस्तांतराला विरोध केल्यानं, त्यावेळी रिक्त असलेलं सीआयडीचं प्रमुखपद मला नाकारण्यात आलं.

माझं कुटुंब पुण्यात असल्यानं मला ही पोस्टिंग हवी होती, यासाठी मी रितसर विनंती अर्ज केला होता. पण तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याला नकार देताना मला आघाडी धर्म पाळावा लागेल, असं सांगत तुम्हाला राष्ट्रवादीचा विरोध असल्याचं ते म्हणाले होते"

अजित पवारांचं सविस्तर उत्तर

बोरवणकर यांच्या गंभीर आरोपांना उत्तर देण्यासाठी अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यामध्ये येरवडा पोलीस स्टेशन जागेचा हस्तांतराचा विषय गृहखात्याचा होता. त्यावेळी गृहखात्याचे मंत्री आर. आर. पाटील होते.

वापरा-बांधा-हस्तांतरीत करा अर्थात बीओटी तत्वावर पुण्यातील पोलीस खात्याच्या जागा विकासकामांसाठी देण्याचा निर्णय मंत्रीमंडळानं घेतला होता. त्याचा जीआरच पवारांनी पत्रकार परिषदेत वाचून दाखवला.

यासंदर्भात नेमलेल्या समितीनं जिल्हाधिकाऱ्यांसह याबाबत निर्णय घेतल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी पालकमंत्री या नात्यानं माझ्यावर होती. त्यानुसार, आपण बोरवणकर यांना भेटीसाठी बोलावून जागा हस्तांतरणाबाबत चर्चा झाली. पण त्यांनी याला नकार दिला. त्यानंतर ही जागा कुठेही हस्तांतरीत झालीच नाही, त्यामुळं त्यात दबाव होता किंवा घोटाळा झाला असं काहीही म्हणता येणार नाही. प्रक्रियेप्रमाणं या गोष्टी घडल्या होत्या, असं अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Election: नव्या प्रभाग रचनेमुळे १६ प्रभागांमध्ये गडबड; ६४ नगरसेवकांवर थेट परिणाम; 'या' पक्षांना बसणार फटका

Latest Marathi News Updates: मी मांसाहार केलेला माझ्या पांडुरंगाला चालतो... - सुप्रिया सुळेंचं विधान!

अनधिकृत बांधकामधारकांना उच्च न्यायालयाचा दणका! आता पाच मजली अनधिकृत इमारतीवर बुलडोझर चालणार

विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाची शेवटची संधी! सोमवारी जाहीर होतील रिक्त जागा; प्रवेशासाठी २९ व ३० ऑगस्टपर्यंत मुदत, वाचा...

Mumbai Goa Highway: गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांची गर्दी! मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

SCROLL FOR NEXT