मुंबई

खारघरमध्ये खाजगी बसला अपघात; खाडीतील कांदळवनात अडकल्याने अनर्थ टळला

गजानन चव्हाण

खारघर : पुणे वरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या बसच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने सदर बस खाडीतील कांदळवन झाडात अडकली. बस प्रवासात सहा प्रवाशी किरकोळ जखमी झाल्याचे खारघर पोलिसांनी सांगितले. सदर प्रकार मंगळवार रात्री  सायन पनवेल महामार्गवरील  खारघर रेल्वे स्थानक पासून काही अंतरावर घडला.

 पुण्यावरून मुंबईच्या दिशेने जाणारी साई ट्रॅव्हल्स वाहन क्रमांक एम एच 03/ CR4112 ही बस काही प्रवाशी घेवून मुंबईच्या दिशेने जात असताना वाहन चालकाचा वाहनावरील नियंत्रण सुटल्याने सदर बस पदपथ आणि दुभाजकावरून खारघर रेल्वे स्थानक पासून काही अंतरावर असलेल्या महामार्गलगत असलेल्या खाडीत जावून थांबली. बसच्या दोन्ही बाजूला कांदळवणची झाडे आल्यामुळे बस जशीच्या तशी उभी राहिली. मात्र यावेळी बस मधील पाच ते सहा प्रवासी किरकोळ जखमी झाल्याचे समजले. या विषयी खारघर पोलीस ठाण्यात संपर्क साधला असता. हा प्रकार रात्री घडला असून पाच ते सहा प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहे. पुढील तपासणीसाठी अधिकारी घटनास्थळी तपास करीत असल्याचे सांगितले. 

Private bus accident in Kharghar Trapped in the mangroves forest in the creek

---------------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT