मुंबई

खासगी रुग्णालयातील ऑक्‍सिजन, व्हेंटिलेटरचा आढावा घ्या; पालिकेचे निर्देश

समीर सुर्वे

मुंबई:  कोविडची दुसरी लाट उसळली असून महानगर पालिकेने आता रुग्णालयातील बेड्‌स नियोजनासाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी कोविडची लक्षण नसलेल्या तसेच दिर्घकालीन आजार नसलेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करुन घेता येणार नाही. तर सर्व खासगी आणि सार्वजनिक रुग्णालयांच्या बेड्‌सचे नियोजन आता प्रभागातील वॉर रुममधूनच होणार आहे. त्याच बरोबर रुग्णालयातील ऑक्‍सिजनचा साठा, व्हेंटिलेटर तसेच इतर आवश्‍यक उपकरणांची पुन्हा एकदा पडताळणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सर्व खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभाग फक्त कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्याबरोबरच सर्वसाधारण विभागातील 80 टक्के बेड्‌स कोविडसाठी राखीव ठेवण्याचे निर्देश आज महानगर पालिका आयुक्त इक्‍बाल सिंह चहल यांनी सर्व रुग्णालयांना दिले आहेत. या उपलब्ध बेड्‌सचा आढावा घेऊन नियोजन करण्याचे निर्देश सर्व प्रभागाच्या सहाय्यक आयुक्तांना देण्यात आले आहे. लक्षण नसलेले तसेच दिर्घकालीन आजार नसलेले कोविड बाधित काही वेळा खासगी रुग्णालयात परस्पर प्रवेश घेतात. या प्रकारालाही लगाम घालण्यात आला आहे. सर्व बेड्‌स नियोजन हे प्रभागाच्या वॉररुम मार्फत करण्यात येणार आहे. त्याच बरोबर लक्षण नसलेले आणि कोणताही दिर्घकालीन आजार नसलेल्या रुग्णांना रुग्णालयात प्रवेश दिला जाऊ नये असे सक्त आदेश आयुक्तांनी दिले आहे.

रुग्णांना रुग्णालयात प्रवेश देण्याचाही प्राधान्यक्रमही प्रशासनाने ठरवला आहे. यात पहिल्यादा प्रभागातील खासगी नर्सिग होम आणि रुग्णालयात प्रवेश देण्यास प्राधान्य देण्यात यावे. त्यानंतर कामगार रुग्णालयांमध्ये मग प्रभागा बाहेरील खासगी रुग्णालये, सरकारी आणि शेवटी पालिकेच्या रुग्णालयात प्रवेश देण्यास प्राधान्य देण्यात यावे, असे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.
 
स्ट्रक्‍चरल आणि फायर ऑडिट करुन घ्या

भांडूप येथील ड्रिम्स मॉलला लागलेल्या आगीच्या पार्श्‍वभूमीवर महानगर पालिकेने सर्व रुग्णालये, कोविड केंद्राचे फायर ऑडिट आणि स्ट्रक्‍चरल ऑडिट करुन घेण्याचे निर्देश दिले आहेत.
 
सरकारी दराने उपचार

खासगी रुग्णालयांसाठी राज्य सरकारने दरपत्रक ठरवले आहे. त्या दरपत्रकानुसारच उपचार करण्यात यावे असे निर्देशही देण्यात आले आहे. यावर लक्ष ठेवण्यासाठी महानगर पालिकेचे लेखापरिक्षकही नियुक्त करण्यात आले आहेत.

 
शिक्षकांना काम

शिक्षकांना पुन्हा कोविड ड्यूटी लागण्याची शक्‍यता आहे. प्रभागातील वॉर रुममध्ये शिक्षक तसेच इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे अधिकार संबंधित प्रभागाच्या सहाय्यक आयुक्तांना देण्यात आले आहे. तसेच आवश्‍यकतेनुसार रुग्णालयात पोलिस बंदोबस्त ठेवण्याची सूचनाही आयुक्त चहल यांनी सहाय्यक आयुक्तांना केली आहे.

---------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Private hospital Review oxygen ventilator bmc directives

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT