Mobile cancer detection van sakal media
मुंबई

मोबाईल कॅन्सर डिटेक्शन व्हॅन मुंबईत; प्रिया दत्त यांच्या हस्ते उद्घाटन

एशियन कॅन्सर फाउंडेशनसह नर्गिस दंत फाउंडेशनचा पुढाकार

भाग्यश्री भुवड

मुंबई : एशियन कॅन्सर फाऊंडेशन (Asian Cancer Foundation) आणि नर्गिस दत्त फाऊंडेशनच्या सहकार्याने सुरु करण्यात आलेल्या मोबाईल कॅन्सर डिटेक्शन व्हॅनद्वारे (Mobile cancer detection van) घरोघरी जाऊन आजाराचे निदान करण्यास मदत होणार आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, खासदार आणि नर्गिस दत्त फाउंडेशनच्या अध्यक्ष प्रिया दत्त (Priya dutt) यांच्या हस्ते या व्हॅनचे उद्घाटन करण्यात आले.

कर्करोग हे देशातील वाढत्या मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. भारतात कॅन्सरचे लाखो रुग्ण आहेत आणि लवकर निदान न झाल्यामुळे ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या जीवघेण्या आजाराचा सामना करण्यासाठी आणि रुग्णांच्या जगण्याचे प्रमाण सुधारण्यासाठी, एसीएफ एक विशेष मोबाइल स्क्रीनिंग वाहन घेऊन आले आहे ज्याची रचना रोग निदान चाचणीसाठी आवश्यक उपकरणांसह करण्यात आली आहे.

एशियन कॅन्सर फाउंडेशनचे कार्यकारी संचालक डॉ. दीपक पारीख म्हणाले, हे नवीन मोबाईल हॉस्पिटल मुंबई आणि महाराष्ट्रातील विविध भागांना भेट देऊन कर्करोगाच्या रुग्णांचा शोध घेणार आहे. कोणत्या प्रकारचा कर्करोग लोकांना सर्वात जास्त प्रभावित करतो आणि त्यामागील कारणे काय आहेत याची नोंद ठेवली जाईल. आजाराबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करून, रुग्णांची तपासणी आणि समुपदेशन केले जाईल. दरवर्षी सुमारे  ५००० लोकांना या मोहिमेत सहभागी करुन घेण्याचे लक्ष्य आहे.

मौखिक कर्करोगाच्या तपासणीसाठी व्हॅनमध्ये डेंटल चेअरचा समावेश असून तसेच तोंडाची बायोप्सी प्रक्रिया केली जाईल. व्हॅनमध्ये स्तन आणि ग्रीवाच्या तपासणीसाठी पॅप स्मीअर चाचण्यांची सोय आहे.  ज्या रुग्णांना आर्थिक मदतीची गरज आहे त्यांना एशियन कॅन्सर फाउंडेशन मदत करेल. मुलींना कॅन्सरबाबत शिक्षण देण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांनाही भेट दिली जाईल

 माजी खासदार आणि नर्गिस दत्त फाउंडेशनच्या अध्यक्ष प्रिया दत्त सांगतात की, रुग्णांना त्यांच्या कर्करोगाच्या उपचारासाठी निधी देण्यासही आम्ही पुढाकार घेत असून त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरु आहेत. कर्करोगाचे वेळीच निदान झाल्यास तो लवकर बरा होऊ शकतो त्यामुळे केवळ उपचारास अथवा निदानास विलंब झाल्याने एखाद्या व्यक्तीला जीव गमवावा लागणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT