मुंबई

खड्ड्याचे बक्षिस अधिकाऱ्यांच्या खिशातून

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईच्या रस्त्यातील खड्डे बुजविण्यासाठी "खड्डे दाखवा आणि 500 रुपये मिळवा" या पालिका आयुक्तांच्या बक्षिस योजनेच्या घोषणे नव्या वादाला तोंड फोडले आहे. पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत आज त्याचे तीव्र पडसाद उमटले. करदात्यांकडून वसूल केलेला पैसे खड्ड्यांच्या बक्षिसासाठी वाटणार काय? असा थेट सवाल सदस्यांनी करताच प्रशासनाला स्पष्टीकरण द्यावे लागले.

बक्षिसाची ही रक्कम पालिकेच्या तिजोरीतून नाही, तर संबंधित विभाग अधिकारी आणि रस्ते विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या खिशातून जाणार आहेत असे स्पष्टीकरण प्रशासनाने दिल्यामुळे खड्डा न बुजल्यास अधिकाऱ्यांच्याच खिशाला खड्डा पडणार आहे. 

कोल्डमिक्‍स, हॉटमिक्‍स हे तंत्रज्ञान फेल ठरल्याने आणि खड्ड्यांवर कोणताही उपाय नसल्याने अपयश झाकण्यासाठी हतबल झालेल्या प्रशासनाला बक्षिसाची रक्कम जाहिर करावी लागली काय? असा सवाल करीत पालिकेचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी वाढते खड्डे आणि बक्षिसाच्या रकमेच्याबाबत समितीच्या बैठकीत हरकतीचा मुद्दा उपस्थित केला होता.

सप्टेंबरमध्ये पावसाळ्याच्या हंगाम संपला तरी नोव्हेंबरमध्ये खड्डे बुजवण्यासाठी योजना जाहीर करावी लागणे ही आश्‍चर्याची आणि खेदजनक बाब आहे. जर खड्डे बुजवण्याचे काम झाले नसेल तर त्यासाठी तरतूद केलेले 80 कोटी रुपये गेले कुठे? अधिकारी आणि अभियंते जबाबदारीने काम करत नसल्याचे यातून सिद्ध होते, असा आरोप विरोधी पक्षनेत्यांनी केला. 

आयुक्तांच्या 500 रुपये बक्षिसाच्या नव्या योजनेविषयी स्थायी समितीत आज जोरदार टीका झाली. त्यावेळी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, खड्डे भरण्यात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना धडा मिळावा, त्यांच्याकडून तातडीने खड्डे बुजवण्याचे काम व्हावे, म्हणून ही योजना जाहीर करावी लागली.

खड्डे दाखवणाऱ्या नागरिकांना पालिकेच्या तिजोरीतून नव्हे, तर विभाग अधिकारी किंवा संबंधित अधिकाऱ्यांच्या खिशातून बक्षिसाची रक्कम देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. महापौरांना किंवा स्थायी समितीला विश्वासात न घेता जाहीर केलेल्या या याजनेच्या बक्षिसाची रक्कम पालिकेच्या तिजोरीतून खर्च न करता आयुक्तांनी स्वतःच्या खिशातून द्यावी अशी मागणीही सभासदांनी केली. 

बक्षिसाच्या रकमेचे वाभाडे 

सवंग लोकप्रियतेच्या घोषणा करण्यापेक्षा यंत्रणा पूर्णपणे कामाला लावा, अशी भुमिका भाजपचे नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनी मांडली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राखी जाधव, कॉंग्रेसचे असिफ झकेरिया, शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर, कॉंग्रेसचे जावेद जुनेजा, शिवसेनेचे नगरसेवक आमदार रमेश कोरगावकर यांनीही यांनीही प्रशासनाच्या या बक्षिसाच्या रकमेबाबत वाभाडे काढले. 

web title : The prize of the pit from the pocket of the officers

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT