मुंबई

मुंबईतील मच्छिमारांचा प्रश्न सुटणार; वाचा काय आहे बातमी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईतील कोळीवाड्यांच्या सीमांकनास प्रशासनाने सुरुवात केली आहे. त्यामुळे कोळीवाड्यांमधील मच्छीमारांची घरे त्यांच्या नावावर होण्याची तसेच सामायिक जमिनी गावठाणाच्या नावावर होण्याची प्रक्रिया सुरू होईल. 

वास्तविक कोळीवाड्यांचे सर्वेक्षण व सीमांकन करण्याचा निर्णय फार पूर्वीच झाला होता; मात्र त्याच्या अंमलबजावणीला आता मुहूर्त सापडला आहे. अनेक कोळीवाड्यांमध्ये कुटुंबे विस्तारल्यामुळे मूळ घरांवर बेकायदा मजले बांधण्यात आले आहेत. त्यामुळे या मजल्यांचा दर्जा काय, हा प्रश्‍न कित्येक वर्षे अनुत्तरित होता. अनेक ठिकाणी सामायिक जागांवरही घरे बांधण्यात आली आहेत. अनेक कोळीवाड्यांच्या सामायिक जमिनी बाहेरील धनदांडग्यांनी हडपल्या आहेत. सीमांकन व त्यापुढील प्रक्रियेने निदान कोळीवाड्यांच्या सध्याच्या जमिनीवरील रहिवाशांचे हक्क अबाधित राहतील, अशी अपेक्षा मच्छीमार नेते व्यक्त करीत आहेत.  

गेल्या ७० वर्षांत कोळीवाड्यांच्या शेजारील सामायिक जमिनीवर पंचतारांकित हॉटेल किंवा टोलेजंग इमारती उभे राहिल्या आहेत. सीमांकनामुळे कोळीवाड्यांची किती जमीन हडपण्यात आली, हेही उघड होईल आणि एकदा सीमा निश्‍चित झाल्या, की या जमिनी संरक्षित होतील, असे मच्छीमार नेते दामोदर तांडेल यांनी सांगितले. कोळीवाड्यांची नेमकी जमीन किती, हे आता कोणालाही सांगता येणार नाही. अनेक घरे उभ्या असलेल्या जमिनीही मच्छीमारांच्या नावावर नाहीत. सीमांकनानंतर प्रत्येक घराच्या क्षेत्रफळाचीही मोजणी होऊन सात-बारा उताऱ्यावर रहिवाशांचे नाव लागेल. घरांच्या मोजणीनंतर तसा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महसूल खात्याकडे व नंतर मंत्रिमंडळासमोर जाईल. त्यांच्या मंजुरीनंतर रहिवाशांच्या नावावर घरांची जमीन होईल आणि सामायिक जागांची गावठाण म्हणून नोंद  होईल, असेही तांडेल म्हणाले. 

पूर्वापार विकास आराखड्यातही कोळीवाड्यांच्या दाखवलेल्या जागा मच्छीमारांनी स्वतःसाठीही वापरल्या आहेत. तो वापर बेकायदा ठरवला जात होता. त्यांना मान्यता मिळण्यासाठी हे सीमांकन व सर्वेक्षण उपयुक्त ठरेल. बेकायदा मजल्यांना व सामायिक जमिनीवर घरे बांधलेल्यांनाही मान्यता देण्याचे सरकारचे धोरण होते. ही प्रक्रिया आता वेगाने सुरू होईल. 
- राजहंस टपके, सरचिटणीस, कोळी महासंघ
.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दंड की चेष्टा? BMC अधिकाऱ्यांना हायकोर्टानं ठोठावला ११ रुपयांचा दंड, २ दिवसाची दिलीय मुदत; प्रकरण काय?

Kolhapur Prisedant : पहिल्या अध्यक्षपदासाठी भाजप आग्रही; सव्वा वर्षाचा कालावधी, महायुतीतील सर्वच घटक पक्षांना मिळणार संधी

UPI Transaction : UPI लिमिटमुळे पेमेंट फेल? जाणून घ्या कशी वाढवायची व्यवहार मर्यादा

घराबाहेर येताच ओमकार आणि आयुषमध्ये हाणामारी, नॉमिनेट का केलं? म्हणत ओमकार धावून गेला आयुषच्या अंगावर, Viral Video

8th Pay Commission च्या नावाखाली मोठी फसवणूक; चुकूनही डाउनलोड करू नका 'हे' नवीन अ‍ॅप, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी धोक्याची घंटा

SCROLL FOR NEXT