मुंबई

ऐकाल तर नवलच! कर्जतमध्ये कोंबडीचोरांचा सुळसुळाट; शेकडो कोंबड्या अचानक गायब

हेमंत देशमुख


कर्जत : कर्जत तालुक्यातील कडाव गावामध्ये काही दिवसांपासून कोंबडीचोरांचा सुळसुळाट झाला आहे. या चोरीने हैराण झालेल्या शेतकऱ्यांनी कोंबडीचोरांना पोलिसांनी पकडावे, अशी मागणी केली आहे.

तालुक्यातील काही शेतकरी शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतीला पूरक धंदा म्हणून शेतकरी कुक्कुटपालनाचा व्यवसाय करत आहेत. जेणेकरून कुटुंबाला चार पैशांचा हातभार लागून उदरनिर्वाह होईल. मात्र, काही दिवसांपासून शेतात काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कोंबड्याही रात्रीच्या वेळेस चोरटे सराईतपणे नेत असण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे आधीच कोरोनाने चिंतातुर झालेला गरीब शेतकरी या चोरीमुळे मेटाकुटीला आला आहे.

कडाव गावातील शेतकरी तथा माजी सरपंच फुलाजी पवार व पांडुरंग दळवी या शेतकऱ्यांच्या सुमारे 100 ते 150 कोंबड्या आठ दिवसांत चोरीला गेल्या आहेत. चोरीस गेलेल्या कोंबड्यांबाबत त्यांनी कडाव गावचे पोलिस पाटील रमेश पवाळी यांच्याही निदर्शनास आणून दिले आहे. तसेच, याबाबतची तक्रार कर्जत पोलिस ठाण्यातही केली आहे. पोलिसांनी गावातील कोंबडीचोरांचा शोध सुरू केला आहे. आर्थिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी कोंबडीचोरांना लवकरात लवकर पकडून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

-----------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT