मुंबई

दरेकरांनी आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्याविरोधात विधानपरिषदेत मांडला हक्कभंग

दीपा कदम

मुंबई, ता. १५ - मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे महानगरपालिकेशी संबंधित विविध विकास कामांबाबत, जनकल्याणविषयक बाबतची माहिती विधिमंडळ व संसदीय कामकाजविषयक कर्तव्य पार पाडण्यासाठी उपलब्ध करुन देण्याची विनंती अनेक पत्रांच्या मार्फत करुनही एखादा अपवाद वगळता कोणत्याही पत्रांना उत्तरे देण्यात आलेली नाहीत, असा गंभीर आरोप विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केला. त्यामुळे या गंभीर प्रश्नी विरोधी पक्षनेते दरेकर यांनी पालिका आयुक्त चहल यांच्याविरुध्द विधानपरिषदेत हक्कंभग मांडला. 

विधानपरिषदेत सभापती रामराजे निंबाळकर यांनी दरेकर यांना विशेषाधिकारभंग सूचना मांडण्याची परवानगी दिली. त्यावेळी हक्कभंग सुचना मांडताना दरेकर म्हणाले की, कोरोना काळात झालेल्या गैरव्यवहारासंदर्भात शेकडो पालिका आयुक्तांना अनेक पत्र दिलीत. कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनाही दिल्या. त्यांच्याकडे काही माहितीही मागवली पण विरोधी पक्ष नेत्यांच्या पत्रांना दोन ओळींच उत्तर देण्याचे सौजन्यही आयुक्तांनी दाखवले नाही. प्रत्येकवेळी पत्रांना उत्तर देण्यासाठी टोलवाटोलवी केली. यामुळे विधिमंडळाने दिलेल्या अधिकाराला न्याय देता येत नाही. विधिमंडळाच्या मूलभूत हक्कावर यामुळे गदा आली आहे असेही दरेकर यांनी नमूद केले. 

सदस्यांनी विधिमंडळ कामकाजात जास्तीत जास्त सहभाग द्यावा, जनतेचे प्रश्न मांडावेत, अंमलबजावणी यंत्रणेच्या त्रुटी सभागृहामार्फत शासनाच्या निदर्शनास आणून द्याव्यात, एकूणच शासनावर अंकुश ठेवावा, अशी अपेक्षा घटनाकारांनी संसदीय कामकाजात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या विधिमंडळाच्या सदस्यांकडून ठेवली आहे असे सांगतानाच दरेकर म्हणाले की, आपले संसदीय कर्तव्य पार पाडण्यासाठी विविध शासकीय कार्यालयाकडील अधिकृत माहिती उपलब्ध होईल व त्याचा उपयोग करुन ते वस्तुनिष्ठ प्रश्न सभागृहात मांडू शकतील, असे अभिप्रेत आहे.  पण माहिती उपलब्ध न झाल्यामुळे जनतेच्या प्रश्नांबाबत सभागृहात योग्य, अधिकृत व ठोस भूमिका मांडता आली  नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. 

हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. त्यामुळे सदर सूचना आपण विधानपरिषद विशेषाधिकार समितीकडे कार्यवाहीसाठी पाठवावे व याप्रकरणी लवकर सभागृहासमोर अहवाल सादर करण्याची सूचना समितीला करावी, अशी विनंतीही दरेकर यांनी सभापतींकडे केली.

proposal of infringement iqbalsingh chahal pravin darekar maharashtra winter session 2020

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता CIBIL Score वाढवण्यासाठी ChatGPT मदत करणार, पण कशी? जाणून घ्या...

Asia Cup, IND vs PAK: 'आम्ही कोणत्याही संघाला...', भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानच्या कर्णधाराने दिली वॉर्निंग

विकासासाठी शांतता हवी, मणिपूरमधील संघटनांना पंतप्रधान मोदींचं आवाहन; राज्यातील परिस्थितीवरही बोलले

Madhya Pradesh : मध्य प्रदेशमधील १.२६ कोटींहून अधिक लाडक्या बहिणींना मिळणार आर्थिक लाभ; मुख्यमंत्री यादव यांची घोषणा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचा वापर मतांच्या राजकारणासाठीचं, निवडणुक जवळ आली पाणीप्रश्‍न पेटला; स्थानिक नेत्यांकडून जनतेच्या समस्यांना केराची टोपली

SCROLL FOR NEXT