नवी मुंबई विमानतळ
नवी मुंबई विमानतळ  
मुंबई

नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यास स्थानिकांचा विरोध

दीनानाथ परब

पनवेल: नवी मुंबई विमानतळाला (Navi Mumbai airport)दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray)यांचे नाव देण्याचा प्रस्ताव सिडकोने राज्य सरकारला पाठवला आहे. पण विमानतळ प्रकल्पामुळे बाधित झालेल्या लोकांचा आणि अन्य स्थानिकांचा प्रस्तावित विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यास विरोध आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि दिवंगत माजी खासदार दिनकर बाळू पाटील यांचे नाव विमानतळाला देण्याची स्थानिकांची मागणी आहे. (Proposal to name Navi Mumbai airport after Balasaheb Thackeray faces opposition from locals)

मागच्या महिन्यात सिडकोच्या संचालक मंडळाने अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला. शहर बांधणीसाठी शहर विकास महामंडळ जेव्हा जमिनीचे अधिग्रहण करत होते, त्यावेळी दिनकर बाळू पाटील यांनी पनवेल जिल्ह्यात शेतकरी आणि जमीन मालकांसाठी अनेक आंदोलने केली.

१९८४ साली आंदोलनाच्यावेळी चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर गावठाण योजना आणली. या योजनेतंर्गत सिडकोने अधिग्रहीत केलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीपैकी शेतकऱ्यांना १२.५ टक्के जागेवर बांधकाम करण्याची परवानगी मिळाली. नवीन मुंबईत विमानतळ बांधण्याचा निर्णय झाला, तेव्हापासून विमानतळाला दिनकर बाळू पाटील याचे नाव देण्याची मागणी होत आहे.

डिसेंबर महिन्यात शहर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी, सिडकोला पत्र लिहून विमानतळाला शिवसेनाप्रमुखांचे नाव देण्याचा प्रस्ताव पाठवण्यास सांगितला. संचालक मंडळाच्या बैठकीत सिडकोने हा प्रस्ताव मंजूर केला. या भागातील सर्व पक्षांची बुधवारी बैठक झाली. सर्वपक्षीय समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला. ही समिती सिडकोला त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करण्यास सांगेल.

"रायगड जिल्ह्यातील जनतेच्या कल्याणासाठी डीबी पाटील यांनी भरीव कार्य केले आहे. पण अजूनपर्यंत एकाही मोठ्या प्रकल्पाला त्यांचे नाव देण्यात आलेले नाही. प्रत्येक प्रकल्पबाधिताची विमानतळाला डीबी पाटील यांचे नाव देण्याची इच्छा आहे" असे प्रशांत ठाकूर यांनी सांगितले. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे. पनवेलचे भाजपा आमदार प्रशांत ठाकूर यांना सर्वपक्षीय समितीचे उपाध्यक्ष बनवण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

IPL 2024 RCB vs CSK Live Score: आनंदाची बातमी! पावसाच्या व्यत्ययानंतर बेंगळुरू-चेन्नई सामन्याला पुन्हा सुरुवात

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : हे मोदींचे युग आहे, आम्ही घरी घुसून मारतो- पंतप्रधान मोदी

SCROLL FOR NEXT