मुंबई

समृद्धी महामार्गाला अजूनही मुदतवाढ नाही; एमएसआरडीसीने दिले 'हे' कारण

समीर सुर्वे


मुंबई : मुंबई-नागपूर समृध्दी महामार्गासाठी राबणारे 30 हजार कामगार लॉकडाऊन आणि पावसामुळे कमी झाले आहेत. मात्र, अद्याप या प्रकल्पाला मुदतवाढ दिलेली नसून कंत्राटदारांकडून त्याबाबत अर्ज आल्यास त्यावर निर्णय घेण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) स्पष्ट करण्यात आले.

मुंबई-नागपूर या 701 किलोमीटर मार्गापैकी इगतपुरी ते नागपूर हा 623 किलोमीटरचा मार्ग प्रथम पूर्ण करण्यात येणार आहे. जुलै महिन्यापर्यंत नागपूर ते इगतपुरीपर्यंतचे मार्गाचे 40 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यानंतर चार-पाच महिन्यांनी इगतपुरी ते मुंबई पर्यंतचे काम पूर्ण होईल. सरकारला 2022 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करायचा आहे. त्यामुळे नागपूर ते इगतपुरी हा टप्पा 2021च्या अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा एमएसआरडीसीचा प्रयत्न आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 55 हजार कोटी रुपये खर्च येणार असून आता 18 हजार कोटीहून अधिक खर्च झाला आहे.

कसारा घाटात 8 किलोमीटरचा बोगदा असून त्यापैकी 2 किलोमीटरचे काम झाले आहे. हा महामार्ग आठ पदरी असून त्यावर वाहानांचा वेग ताशी 150 किलोमीटरपर्यंत असणार आहे. सध्या नागपूर ते मुंबई अंतर पार करण्यासाठी 16 तासांचा कालावधी लागतो. या महामार्गामुळे हा कालावधी 8 तासांवर येणार आहे. तर मुंबई ते औरंगाबाद हे अंतर 4 तासात पूर्ण होणार आहे.

लॉकडाऊनपूर्वी या प्रकल्पासाठी तब्बल 30 हजार कामगार राबत होते. मात्र, लॉकडाऊन आणि पावसाळ्यामुळे ही संख्या निम्मी झाली आहे. मात्र, अद्याप प्रकल्पाला मुदतवाढ दिलेली नसून कंत्राटदारांकडून त्याबाबत अर्ज आल्यास निर्णय घेण्यात येईल. 
- अनिलकुमार गायकवाड,
सह संचालक, एमएसआरडीसी

महामार्गाची वैशिष्ट्ये :

  • - 50 हून अधिक उड्डाणपूल
  • - 24 हून अधिक इंटरचेंज
  • - 5 पेक्षा जास्त बोगदे
  • - 10 जिल्ह्यांतील 391 गावातून मार्ग जाणार
  • - इतर 14 जिल्ह्यांना फायदा होणार

-----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे ) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water: उन्हाळ्यापूर्वीच मुंबईकरांवर पाणीसंकट! सातही धरणांतील साठ्यात घसरण; 'या' दिवसापासून पाणीकपात जारी

स्वस्त हॉटेल, कमी बजेट आणि इंटीमसीचा भडीमार, कुठे आणि कसा शूट होतो बी-ग्रेड सिनेमा?

Panand Road Scheme : अक्षय तृतीयेला पाणंद रस्ते योजनेचा प्रारंभ, शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा

Nashik sex scandal: खरातनंतर नवं सेक्स स्कँडल! चोरी गेलेला टॅब ठरला संकट, २०० व्हिडिओंनी उघड केलं मोठं रहस्य, तक्रारदारच अडकला

Pune Ring Road Work Accident : पुण्यात रिंग रोडच्या कामावेळी तरुणाचा बुडून मृत्यू, शिडीवर चढताना पाय घसरला अन्, ४० फूट नदीपात्रात कोसळला

SCROLL FOR NEXT