Prithviraj Chavan Esakal
मुंबई

Prithviraj Chavan: हिंदुत्ववादी म्हणजे दहशतवाद, माजी मुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य; युवा सेना आक्रमक

Navi Mumbai News: पृथ्वीराज चव्हाण यांनी एका मुलाखतीदरम्यान “हिंदुत्ववादी म्हणजे दहशतवादी आणि सनातन म्हणजे दहशतवाद” असे वक्तव्य केले. या वक्तव्यामुळे नवी मुंबई युवासेनेच्या वतीने शांततेत आंदोलन करण्यात आले.

Mansi Khambe

नवी मुंबई : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एका मुलाखतीदरम्यान “हिंदुत्ववादी म्हणजे दहशतवादी आणि सनातन म्हणजे दहशतवाद” असे वक्तव्य केले. या वक्तव्यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप युवासेनेचे नवी मुंबई जिल्हाप्रमुख अनिकेत म्हात्रे यांनी केला आहे. या वक्तव्याच्या निषेधार्थ आज नवी मुंबई युवासेनेच्या वतीने शांततेत आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला.

पृथ्वीराज चव्हाण यांच्या या विधानामुळे संपूर्ण हिंदू समाजात संतापाची लाट उसळली आहे. भारत हा विविध धर्मांमध्ये एकात्मता जपणारा देश आहे. त्यामध्ये सनातन हिंदू धर्म ही फक्त एक श्रद्धा नसून, हजारो वर्षांची परंपरा, तत्त्वज्ञान आणि सहिष्णुतेचा संदेश देणारी जीवनशैली आहे. अशा धर्माला ‘दहशतवादाशी’ जोडणे हे केवळ अज्ञानाचे नव्हे तर राजकीय स्वार्थासाठी धर्मद्रोही भूमिका घेण्याचे लक्षण आहे, असे युवासेनेचे नवी मुंबई जिल्हाप्रमुख अनिकेत म्हात्रे यांनी सांगितले.

त्‍यांनी आंदोलनाच्या माध्यमातून विविध मागण्या सरकारपुढे मांडल्या. पृथ्वीराज चव्हाण यांनी हिंदू समाजाची जाहीर माफी मागावी, राज्य सरकारने या वक्तव्याची गंभीर दखल घेऊन चौकशी व कारवाई करावी, भविष्यात कोणतीही व्यक्ती कोणत्याही धर्माविषयी अपमानास्पद विधान करत असेल, तर त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी म्‍हात्रे यांनी केली.

बॉम्बस्फोट प्रकरणी पृथ्वीराज चव्हाण यांचं मत

आंदोलन करण्याचा प्रत्येकाचा हक्क, अधिकार आहे; पण मुद्दा नेमका काय आहे? हे समजून घ्यायला हवे. एनआयए राष्ट्रीय यंत्रणा आहे. २०१४ पासून अमित शहा यांच्या निदर्शनात तपास सुरू होता. ठोस पुरावा असेल तर शिक्षा देता येते, अपुरा पुरावा सादर केल्याने शिक्षा देता आली नाही. अर्धवट माहिती घेऊ नका, मी काय म्हटले ते व्यवस्थित ऐकून व्यक्त झाले पाहिजे. दहशतवादाला जात, धर्म, रंग नसतो असे मी बोललो होतो; पण सोयीने अर्थ काढून मूळ मुद्दा बाजूला करण्यासाठी माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून राजकारण केले गेले. पण बॉम्बस्फोट कुणी केला हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. ते तपासाचे काम सरकारचे आहे, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video Viral: नागपूर फ्रेंडशिप डे पार्टीत राडा... आयोजकाची पोलिसांना थेट बावनकुळेंच्या नावाने धमकी, पोलिस प्रशासन कोण चालवतंय?

' तू माझी ताकद आहेस...' रितेशची जेनिलियासाठी खास पोस्ट, म्हणाला...'बायको, मी तुझ्यावर खूप खूप प्रेम करतो'

Kavya Maran: हे काय बरोबर नाय! SRH फ्रँचायझी मालकीण काव्याने रिप्लेसमेंट म्हणून दोन पाकिस्तानी खेळाडूंना संघात करारबद्ध केले

Hasan Mushrif Rajesh Patil : मंत्री हसन मुश्रीफांवर राजेश पाटील नाराज? ताकद द्या..., कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केली खदखद

AI Teacher : हॅलो वर्ल्ड म्हणत झाली AI Teacher ची एन्ट्री; Extra Intelligence झाले लाँच. शिक्षण क्षेत्रात एआयचा असा होणार फायदा

SCROLL FOR NEXT