Protest demonstration sakal media
मुंबई

केईएम रॅगिंग प्रकरण : प्रशासनाचा हलगर्जीपणा, रुग्णालयाबाहेर निदर्शने

मिलिंद तांबे

मुंबई : केईएम रुग्णालयात झालेल्या सुमित पडघन या दलित विद्यार्थ्यांचे जे रॅगिंग प्रकरण घडले आहे. त्या संदर्भात पोलीसांकडून अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा (Atrocity case) दाखल करण्यात आला. परंतु आजतागायत सदर प्रकरणात एफआयआर मध्ये नावे असलेल्या एकाही आरोपीला अटकही केली नाही किंवा साधे चौकशीलाही बोलाविले नाही. त्यामुळे प्रकरण दाबण्याचा व आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न महाविद्यालय अधिष्ठात्या व पोलिसांकडून होत असल्याने केईएम रुग्णालयात (KEM hospital) मंगळवारी जातीअंत संघर्ष समितीने मूक निषेध निदर्शने केली. त्याचसोबत झोन 4 चे पोलीस उपायुक्त विजय पाटील यांना याप्रकरणी लक्ष घालण्याचे निवेदन दिले. (Protest demonstration against kem hospital authorities and police irresponsibility on ragging issue)

हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी असलेला सुगत भरत पडगन केईएम रुग्णालयात ऑक्युपेशनल थेरपीच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत आहे. त्याच्यावर 2019 पासून महाविद्यालयातील उच्च वर्गातील विद्यार्थ्यांकडून रॅगिंग होत असल्याचे सांगण्यात येत आहे. वरच्या वर्गातील विद्यार्थी आपल्या मुलाला शारीरिक आणि मानसिक त्रास देत असल्याचा आरोप वडिलांनी केला आहे. त्यांच्या मुलाने रुग्णालयाचे तत्कालीन अधिष्ठाता आणि वॉर्डन यांना लेखी तक्रार दिली असली तरी, तक्रारीचे निराकरण करण्याऐवजी वॉर्डननेच त्यांच्या मुलाला महाविद्यालयात आणि हॉस्टेलमधून काढून टाकण्याची धमकी दिली.

मात्र त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. न्यायासाठी विद्यार्थी आणि पालकांनी एससी/एसटी आयोगाकडे देखील धाव घेतली. तसेच भोईवाडा पोलीस ठाण्यात लेखी तक्रारही देण्यात आली आहे. त्यामुळे 17 जणांवर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा नोंदविला आहे. त्यात वोर्डन आणि विदयार्थ्यांचा सहभाग आहे. त्यामुळे या प्रकरणी वसतिगृहाचे 17 जणांवर भोईवाडा पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यात वोर्डन आणि विद्यार्थांचा सहभाग करण्यात आला.

मात्र अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्टचा कलम 4 ए अनुसार संबंधित तत्कालीन अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख, अ‍ॅकेडमिक अधिष्ठाता डॉ. मिलिंद नाडकर यांच्यावरही प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला म्हणून सहआरोपी म्हणून गुन्हा नोंदवायला हवा अशा मागणीचे निवेदन निदर्शने झाल्यावर पोलीस उपायुक्त पाटील यांना देण्यात आले, असे जाती अंत संघर्ष समितीचे अध्यक्ष सुबोध मोरे यांनी दिली.

मागण्या

1) रॅगिंग आणि अ‍ॅट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल झालेल्या सर्वाना तत्काळ अटक करावी.

2) सदर प्रकरण जाणिवपूर्वक दडपण्याचा प्रयत्न करणार्‍या या रुग्णालयातील दोन्ही डीनच्या विरोधात आणि पोलिसांच्या विरोधात अ‍ॅट्रोसिटी कलम 4 अंतर्गत सहआरोपी करून त्यांना तत्काळ निलंबित करावे.

3) पीडित सुगत पडघन याला संरक्षण द्यावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेस सरकारचा वादग्रस्त निर्णय, शिवाजी महाराजांचं नाव बदलून मेट्रो स्टेशनला 'सेंट मेरी' नाव; फडणवीस म्हणाले, नेहरूंच्या काळापासून...

Hadapsar To Diveghat Route Closed: हडपसर ते दिवेघाट मार्ग शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद

Gold Rate Today : पाच दिवसांच्या तेजीनंतर सोने उतरले, चांदीची चमकही झाली कमी; तुमच्या शहरातील ताजा भाव काय? जाणून घ्या

Mumbai Traffic: प्रभादेवी पूल वाहतुकीसाठी बंद, 'असे' असतील पर्यायी मार्ग; अत्यावश्यक वाहनांसाठी विशेष सोय

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींमुळे वित्तीय तूट नाही; उच्च न्यायालयामध्ये शासनाचे उत्तर, सरकार योजनेवर ठाम

SCROLL FOR NEXT