मुंबई

साहेबांच्या घराची रेकी, शारीरिक इजा आणि अस्वच्छ हेतू; जितेंद्र आव्हाडांचा मोठा दावा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: गेले जवळपास पाच महिने एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. संपकऱ्यांची विलीनीकरणाची मागणी मान्य झाली नसली तरी इतर सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांकडून जल्लोष साजरा केला गेला असला तरी त्याच्या दुसऱ्याच दिवशी काही एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्ला केला होता. हातात दगड आणि चपल्ला भिरकावत त्यांनी पवारांच्या 'सिल्व्हर ओक' बंगल्यावर कूच केली होती. या हल्ल्यानंतर प्रशासन हडबडून जागं झालं आणि मग त्यानंतर कारवाई करण्यात आली. एसटी संपकऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनाही सध्या अटक करण्यात आली आहे. एसटी संपकऱ्यांना चिथावणी कुणी दिली आणि त्यांचा नेमका उद्देश काय होता, हे तपासण्याचं काम सध्या सुरु आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलन सध्या राज्यात चर्चेचा विषय बनला आहे. (Sharad Pawar)

शरद पवारांच्या निवासस्थानावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित होता आणि त्यासाठी रेकी करण्यात आल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. हा हल्ला करणाऱ्यांचा हेतू स्वच्छ नसल्याचाही निर्वाळा त्यांनी दिला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत आता एक ट्विट केलंय. त्यांनी म्हटलंय की, परवा साहेबांच्या घरी हल्ला झाला. हा हल्ला करणाऱ्यांचा हेतू स्वछ नव्हता. त्यांनी साहेबांच्या घराची रेकी केली होती आणि त्यांना पवार साहेबांना शारीरिक इजा करायची होती. पुढे ते म्हणाले की, महाराष्ट्राचे नशीब की असं काही घडले नाही. (Sharad Pawar)

एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटलंय की, राष्ट्रवादी पक्ष आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहे, मात्र, चुकीच्या नेतृत्त्वाखाली पाठीशी नाही असेदेखील शरद पवार यांनी म्हटले आहे. नेता चुकीचा असेल तर, त्याचा परिणाम काय होतो, ते आज दिसंल असंदेखील पवार यांनी गुणरत्ने सदावर्ते यांच्यावर नाव न घेता हल्लाबोल केला आहे. (Sharad Pawar First Reaction On ST Worker Protest)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इंडियन प्रीमिअर लीग अनधिकृत? BCCI विरोधात केरळ उच्च न्यायालयात विचित्र याचिका दाखल; २८ पासून लीग सुरू होणार की नाही?

हर हर महादेव! 'राजा शिवाजी'चा टीझर प्रदर्शित, जिनिलिया साकारतेय 'ही' महत्वाची भूमिका, रितेशला पाहून सगळेच झाले थक्क

Horoscope : गुढी पाडव्यानानंतर 'या' 3 राशींना धनलाभ सुरू; दर महिन्याला मिळेल नवी खुशखबर, साडे तीन मुहूर्त काळात नशिबाचे चक्र फिरणार

Latest Marathi News Live Update : प्रोटोकॉल मुद्द्यावर उपमहापौर संजय घाडी नाराज; पदाचा सन्मान राखण्याची प्रशासनाला करून दिली आठवण

Sound System Ban : देव-देवतांच्या मिरवणुकीत आता 'या' गोष्टींना नो एन्ट्री; सरकारने काय दिले संकेत? संस्कृती जपण्यासाठी उचलणार कठोर पाऊल!

SCROLL FOR NEXT