मुंबई

चोर बाजारातील व्यावसायिकांचं किशोरी पेडणेकरांच्या बंगल्याबाहेर आंदोलन

पूजा विचारे

मुंबईः  गेल्या काही दिवसांपासून चोरबाजार परिसरात छोटे व्यवसाय करणाऱ्यांना हटवण्यात येत आहे. चोर बाजार परिसरात छोटा मोठा व्यवसाय करणाऱ्या व्यावसयिकांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या बंगल्याबाहेर आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे.

चोरबाजार परिसरात गेल्या काही दिवसांपासून महापालिकेकडून कारवाई करण्यात येत आहे. या विरोधात आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या निवासस्थानाबाहेर या सर्व व्यवसायिकांनी आंदोलन केलं. त्यामुळे व्यवसायिकांनी आम्ही कुठं जायचं हा सवाल उपस्थित केला आहे.

याठिकाणी हे व्यवसायिक गेल्या 50 ते 60 वर्षापासून पिढ्यानपिढ्या व्यवसाय करत आहेत. मात्र त्यांना आता याठिकाणाहून हटवण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न करण्यात येत आहे. तसंच आमच्यावर होणारी कारवाई तत्काळ थांबवण्यात यावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.

या व्यावसायिकांचं म्हणणं आहे की, टाळेबंदीपूर्वी महापौर किशोरी पेडणेकर यांनी आम्हांला आश्वासन दिलं होतं की, आम्ही कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. मात्र अजूनही महापौरांनी काहीच हालचाल न केल्यामुळे त्यांना याची आठवण करून देण्यासाठी आम्ही आंदोलन करत असल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे.

आंदोलनावर किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया

यावेळी महापौर किशोरी पेडणेकर यांनी या आंदोलकांची भेट घेतली आणि आंदोलकांचं निवेदन स्विकारलं आहे.

यावेळी बोलताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, हा संपूर्ण प्रकार भेंडी बाजार परिसरातील आहे. त्या ठिकाणी असणारा वाद हा मुस्लिम समाजातील दोन जमातीचा आहे. मी नगरसेविका झाले त्यावेळी मी स्वतः व्हिजिट केली होती. महापालिकेने रस्ता मोकळा करून घ्यावा. मी आयुक्तांसोबत बोलते. आयुक्तांना रस्ता उघडून देण्यासाठी आदेश देईल. मी उद्या त्याठिकाणी भेट देईल आणि आयुक्तांना याबाबत माहिती देईल. पुढील आठवड्यापर्यत याबाबत निर्णय घेऊ आणि त्यांचा विषय मार्गी लावू.

Protest outside mayor Kishori Pednekar bungalow by traders Chor Bazaar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SC on Hinduism: श्रद्धा सिद्ध करण्यासाठी मंदिरात जाण्याची गरज नाही, हिंदू धर्माबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण

Narendra Modi convoy: मोदींच्या ताफ्यात फक्त २ गाड्या! इंधन बचतीसाठी PM मोदींची मोठी कृती; व्हिडिओ देशभर व्हायरल

कोट्यवधींची हिरे, सोन्याचे दागिने आणि अनेक किलो चांदी, अमिताभ-जया बच्चन यांच्या दागिन्यांची किंमत ऐकून धक्का बसेल

Numerology : 'या' 2 मुलांकाच्या लोकांना नेहमीच मिळते सगळ्यांकडून प्रेम; यांच्यावर कुणी फारवेळ राहुच शकत नाही नाराज

केडीएमसीमध्ये शिंदेसेना-मनसेची जवळीक! श्रीकांत शिंदे आणि राजू पाटलांची यांची भेट; पडद्यामागे काय घडलं?

SCROLL FOR NEXT