मुंबई

व्हिडीओ कॉलवर गुप्तांग दाखवणाऱ्याला अटक 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महिलेला वारंवार व्हिडीओ कॉल करून गुप्तांग दाखवणाऱ्या एका विकृत व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. सदर आरोपीने महिलेचा नंबर फेसबुकवरून मिळाला असल्याचा दावा केला आहे. संबंधित प्रकरणाचा सध्या पोलिस तपास करीत आहेत. 
रवीकांत रामदार तिवारी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो विलेपार्ले येथे वास्तव्याला होता.

तिवारी हा मूळचा उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथील रहिवासी आहे. तक्रारदार महिला ही कफ परेड येथील रहिवासी असून ती पतीसोबत तेथे राहते. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात महिलेच्या मोबाईलवर अनेक मिस्ड कॉल व मिस्ड व्हिडीओ कॉलही आले होते. त्या वेळी पतीने तिला याबाबत विचारले असता कॉल करणाऱ्याला आपण ओळखत नसल्याचे तिने सांगितले. त्यानंतर ८ नोव्हेंबरला महिलेला पुन्हा व्हिडीओ कॉल आला. या वेळी महिलेने कॉल उचलला असता समोरील व्यक्तीने स्वत:चे गुप्तांग दाखवले. त्या वेळी घाबरलेल्या महिलेने शेजारी असलेल्या पतीला हा प्रकार सांगितला. त्या वेळी त्याने मोबाईलचा स्क्रीन शॉट घेतला व थेट कफ परेड पोलिस ठाणे गाठत संबंधित प्रकरणाबाबत तक्रार केली.

त्यानंतर पोलिसांनी विनयभंग, माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला व तांत्रिक माहितीच्या मदतीने आठ महिन्यांत आरोपीला पकडले. आरोपी तिवारी याला शुक्रवारी (१६) रोजी विलेपार्ले येथून अटक करण्यात आली असून गुन्ह्यात वापरलेला मोबाईलही त्याच्याकडून जप्त करण्यात आला आहे.

फेसबुकवर नंबर मिळाल्याचा दावा

चौकशीत आरोपीला फेसबुकवरून या महिलेचा दूरध्वनी मिळाला असल्याचे त्याने सांगितले. संबंधित नंबर मिळाला त्या ठिकणी ही महिला कॉलगर्ल असून मजा करायची असल्यास कॉल करा, असा संदेश लिहिण्यात आला होता. संबंधित दाव्याची पोलिस पडताळणी करत असून पुढील तपास सुरू आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: सोशल मीडिया त्याला चांगला जमतो; लहानपणापासूनच नौटंकी...; Viral Videoवरून अजितदादांचा रोहित पवारांवर निशाणा

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

Mother's Day 2024: 'मदर्स डे' निमित्त आईसोबत करा दक्षिण भारतातील 'या' सुंदर ठिकाणांची भटकंती

Latest Marathi News Live Update: नरेंद्र मोदी अन् भाजपचा फोकस कोणत्याही किंमतीवर सत्ता मिळवण्यावर - सोनिया गांधी

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : कोल्हापूर-हातकणंगलेमध्ये मतदानावरुन वाद

SCROLL FOR NEXT