ptyas mucosa snake sakal media
मुंबई

...अन् धामण साप अडकला बिअरच्या टिन मध्ये

मिलिंद तांबे

मुंबई : मद्य मिळवण्यासाठी (Alcohol) माणसं काय काय करतात याच्या तर्हेवाईक गोष्टी आपण नेहमीच ऐकतो. मात्र आज चक्क एक साप मद्याच्या वासाने (Alcohol smelling) प्रभावित होऊन बिअरच्या टिन मध्ये (beer bottle) अडकल्याची घटना समोर आलीय. गोरेगावच्या साईबाबा संकुलात हा विचित्र प्रकार घडला. धामण जातीच्या (Ptyas mucosa) बिनविषारी सापाला आजही मोठी परीक्षा द्यावी लागली. या धामण जातीचा साप बियरच्या वासाने आकृष्ट होऊन बियरच्या फेकलेल्या एका टिन जवळ आला.

टिनच्या फोडलेल्या छिद्रातून त्याने आपले डोके आत घालून आतील द्रव चाटण्याचा प्रयत्न सुरू केला.या प्रयत्नात त्याचे डोके चक्क बिअरच्या टीनमध्येच अडकले. सापाने टिन मध्ये आपले अडकलेले डोके बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला मात्र त्याला ते काही जमले नाही. त्यामुळे त्याची जगण्यासाठीची धडपड सुरू झाली.

सापाच्या धडपडण्यामुळे रिकाम्या टिनचा आवाज आसपासच्या राहिवाशांच्या कानावर गेला. त्यांनी येऊन पाहिले असता धामण साप टिन मध्ये अडकल्याचे पाहिले. त्यांनी या प्रकाराची माहिती सर्पसंस्थेला दिल्यानंतर त्यांचे एक पथक तिथे दाखल झाले. सर्प संस्थेच्या स्वयंसेवकांनी अथक प्रयत्न करून सापाचे डोके बाहेर काढण्यात यश मिळवले.

टिन मध्ये डोके अडकल्याने सापाच्या डोक्याला काही किरकोळ जखमा झाल्या होत्या असे स्प्रेडिंग अवेअरनेस ऑन रेप्लाइल्स एण्ड रिहेबिलिटेशन प्रोग्राम (सर्प) या प्राणीप्रेमी संस्थेचे तन्मय जोशी यांनी सांगितले. काही रहिवाश्यानी सापाचा हा कारनामा पाहून बेवडा साप अशी आरोळी ठोकत गोंधळ घातला. त्यामुळे साप अधिक बिथरल्याचे ही जोशी म्हणाले.मात्र काही संवेदनशील राहिवाश्यांच्या मदतीमुळे या सापाची सुटका झाली असुन लोकांनी अशा परिस्थितीत सर्प मित्र संघटनेला संपर्क करून वन्य जीवांना मदत करावी असे संस्थेचे संस्थापक संतोष शिंदे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणी नागरीक ढसाढसा रडले, तेहरानमध्ये लोटला जनसागर; भारतात काश्मीरमध्येही रस्त्यावर उतरले लोक

Horoscope 2026: मार्चमध्ये ‘या’ 3 राशींचा लागणार जॅकपॉट! पण काहींसाठी वाढणार अडचणी

Amravati Crime : माझी हो...अन्यथा जाळून मारेल! एकतर्फी प्रेमप्रकरणातून १० वीच्या विद्यार्थिनीला धमकी; परीक्षा केंद्रासमोरच राडा

Katol Explosion News : काटोलमध्ये बारूद कंपनीत मोठा स्फोट; १२ कामगारांचा मृत्यू, अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

Maharashtra Weather Update : मार्चमध्ये उष्णतेच्या लाटा; उन्हाचा चटका अधिक जाणवणार; यंदा उन्हाळ्यात कसं असेल तापमान?

SCROLL FOR NEXT