Pune  sakal
मुंबई

Pune: कटरने वार करून युवकाला जीवे मारण्याचा प्रयत्न, वाचा नक्की कुठे घडला प्रकार !

Pune Crime: या प्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी एकावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

सुवर्णा कांचन

Latest Crime News : पोरीच्या मागे फिरण्याच्या कारणावरून कटरने वार करून एका युवकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उरुळी कांचनमधील टिळेकरवाडी येथे शनिवारी (ता. १८) रात्री आठच्या सुमारास घडली. या प्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी एकावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

चैतन्य कांबळे (रा. गॅस गोडाऊन जवळ आश्रम रोड, उरूळी कांचन, ता. हवेली) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. यासंदर्भात शुभम बलभीम सूर्यवंशी (वय २०, रा. टिळेकरवाडी, ता. हवेली) या‌ युवकाने फिर्याद दिली आहे.

उरुळी कांचन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चैतन्य कांबळे याने शनिवारी (ता. १७) रात्री आठच्या सुमारास फिर्यादी शुभम सुर्यवंशी याला टिळेकरवाडी येथील चौकात बोलावून घेतले. "तू पोरीचा मागे का फिरतो" असे म्हणत कांबळे याने सूर्यवंशीच्या दंडावर, पोटरीवर, बरगडीवर तसेच दंडावर कटरने वार केले. या हल्ल्यात सूर्यवंशी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

रात्री बसमध्ये झोपलेली, सीटच्या मागून कमरेत हात; सई ताम्हणकरने तोच हात पकडला आणि... स्वतः सांगितला तो प्रसंग

Agricultural Crime : रात्रीतून फळबागेतील डाळिंब लंपास चौसाळ्यातील घटना, गुन्हा नोंदविण्यासाठी वजन-किमतीचा मुद्दा ठरतोय कळीचा

Video : "यापेक्षा कार्टून बरं" जानकी-हृषीकेशमध्ये येणार दुरावा ; घरोघरी मातीच्या चुलीवर प्रेक्षक वैतागले

Share Market: शेवटच्या तासात शेअर बाजाराचा यू-टर्न! घसरणीनंतर सेन्सेक्स वाढीसह बंद; तर निफ्टी...; वाचा बाजाराची स्थिती

SCROLL FOR NEXT