Baba Siddique sakal
मुंबई

Baba Siddique: बाबा सिद्दिकी हत्या, आरोपीस पुण्यातून अटक; हत्येप्रकरणी २७वा आरोपी अटकेत

Crime News: बहुचर्चित बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणात २७वा आरोपी अमोल गायकवाड याला पुण्यातून अटक करण्यात आली. त्याने प्रमुख आरोपी शुभम लोणकरला पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : बहुचर्चित बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात सहभागी असलेल्या अमोल गायकवाड या तरुणास मुंबई गुन्हे शाखेने पुण्यातून बुधवारी (ता. २७) अटक केली.

या गुन्ह्यासाठी अर्थसहाय्य पुरविण्यापासून प्रमुख आरोपी शुभम लोणकर यास पळून जाण्यास सर्वतोपरी सहकार्य केल्याचा आरोप अमोलविरोधात आहे. गुरुवारी विशेष मकोका न्यायालयाने अमोलला ८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अमोल या प्रकरणात अटक झालेला २७वा आरोपी आहे.

सिद्दीकी यांच्या हत्येचा कट आखण्यासाठी लोणकर याने घेतलेल्या बैठकांना अमोल हजर होता. वाघोली परिसरात राहणाऱ्या आणि भंगार विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या अमोलने या गुन्ह्यासाठी आरोपींना अर्थसहाय्य पुरविले.

सिद्दीकी यांच्या हत्येआधी आणि नंतरही लोणकरसह अन्य आरोपी अमोलच्या संपर्कात होते. लोणकर यास पुण्यातून पसार होण्यास आणि पोलिसांच्या हाती न लागता दडून राहण्यास सर्वतोपरी सहकार्य केल्याचा अमोलवर आरोप ठेवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT