Kalyan Loksabha sakal
मुंबई

Kalyan Loksabha: चोवीस तासाच्या आत शिंदे गटातून पुन्हा ठाकरे गटात, म्हणाले बळजबरीने पक्ष प्रवेश केला गेला..

कल्याणचे माजी नगरसेवक पुरुषोत्तम चव्हाण म्हणाले मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत;

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

Dombivali News: कल्याण लोकसभा मतदारसंघात निवडणूकीच्या रिंगणात शिवसेनेचे ठाकरे व शिंदे गटाचे उमेदवार समोरासमोर उभे ठाकले आहेत. शिवसेना ठाकरे गटाची ताकद कमी करण्यासाठी ऑपरेशन धनुष्यबाण शिंदे गटाच्या वतीने राबविले जात असून ठाकरे गटाचे पदाधिकारी फोडून त्यांना शिंदे गटात सामील केले जात आहे.

मंगळवारी ठाकरे गटाचे डोंबिवली शहर प्रमुखांसह कल्याणचे माजी नगरसेवक पुरुषोत्तम चव्हाण यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. प्रवेशास चोवीस तास उलटत नाही तोच ते स्वगृही परतले आहेत.

मी ठाकरे गटातच, माझा बळजबरीने पक्ष प्रवेश केला गेला असल्याचे यावेळी त्यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले. कल्याण लोकसभेत दोन्ही गट आपली ताकद पणाला लावत असून येत्या काही दिवसांत आणखी राजकिय घडामोडी पहायला मिळतील.

कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत पहायला मिळत आहे. शिंदे गटाकडून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

मंगळवारी वैशाली दरेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे उपस्थित होते. या दरम्यानच शिंदे गटाने ठाकरे गटाला खिंडार पाडत धक्का दिला. डोंबिवली शहर प्रमुख खामकर, महिला संघटक कविता गावंड, कल्याणचे माजी नगरसेवक पुरुषोत्तम चव्हाण यांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला.

हा पक्ष प्रवेश होऊन चोवीस तास उलटत नाही तोच शिंदे गटास एक धक्का बसला आहे. शिंदे गटात प्रवेश केलेले माजी नगरसेवक चव्हाण यांनी मी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असे म्हणत ठाकरे गटात आपण कायम असल्याचे सांगितले आहे.

बुधवारी कल्याण पूर्वेतील वालधूनी शिवसेना शाखेत ठाकरे गटाच्या नेत्यांच्या उपस्थित पुन्हा ठाकरे गटात प्रवेश केला आहे. या वेळी कल्याण लोकसभा मतदार संघातील महाआघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर आणि ठाकरे गटाचे नेते विजय साळवी यांनी शिंदे गटावर सडेतोड टिका केली आहे.

तर माजी नगरसेवक चव्हाण यांनी मी आपल्या व्यक्तिगत कामासाठी गेलो होतो. माझा बळजबरीने पक्ष प्रवेश करुन घेतला असल्याचे सांगितले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Repo Rate: कर्जदारांना मोठा धक्का? ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये रेपो रेट वाढण्याची शक्यता; EMI किती वाढणार?

एका रिलवर विश्वास ठेवला अन् १५ वर्षांनी आई झाली मराठी अभिनेत्री; व्हिडिओ शेअर करत सांगितलं नेमकं काय घडलं

Petrol Pump Facilities: पेट्रोल पंपांवरील ‘हवाच गुल’, भरणार कुठे?हवेचे यंत्र बंद, शौचालयांना कुलूप; वाहनधारकांना पिण्याचे पाणीही मिळेना

CM विजय यांनी नवजात बाळांना दिली सोन्याची अंगठी; भाजपने टीका करत म्हटलं, मुलांना दुधाची जास्त गरज

Thane News: ठाण्यात शिंदेंच्या कार्यकर्त्याला महिलांनी धु-धू धुतला, पोलिसांसमोर घडला प्रकार; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT