मुंबई

मुंबईत मे महिन्यात केल्या गेलेल्या टेस्टिंग्सवर प्रश्नचिन्ह, एकीकडे वाढणारी रुग्णसंख्या तर दुरीकडे कमी टेस्टिंग्स?

सकाळवृत्तसेवा

मुंबई - मुंबईमध्ये कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना त्या तुलनेत टेस्टिंगची क्षमता वाढताना दिसत नाही. त्यामूळे मुंबईत मे महिन्यात केल्यागेलेल्या टेस्टिंगच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. 

मुंबईत टेस्टिंगची क्षमता दर दिवशी 10 हजारांची आहे. मात्र, प्रत्यक्षात फक्त 4 हजार ते 4 हजार 200 टेस्ट केल्या जातात. महाराष्ट्रात ही टेस्टिंगची संख्या तुलनेने बरी असुन गेल्या महिन्यात 100 टक्के टेस्टिंग करण्यात आल्या होत्या. संपुर्ण महाराष्ट्रातून 1 मे या दिवशी 7 हजार 237 टेस्ट केल्या गेल्या होत्या. त्यांचे प्रमाण 31 मे पर्यंत 14 हजात 504 केल्या गेल्या होत्या. 

नवीन टेस्टचे प्रमाण मुंबई बाहेर वाढले आहे. मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक 70 टक्के कोरोना रुग्ण आहेत. मात्र, असे असताना राज्याच्या तुलनेत फक्त 50 टक्के टेस्टिंग झाल्या आहेत. पुण्यात दरदिवशी 1200 ते 1500 टेस्ट केल्या जातायत. मार्च महिन्यात 70 ते 75 टक्के टेस्ट मुंबईत झाल्या मात्र मे महिन्यात टेस्टिंगची संख्या कमी झाली. 

सर्वाधिक टेस्ट हाच संक्रमण रोखण्यासाठी उपाय 

लक्षणे नसलेले पण कोरोना पॉझिटिव्ह असलेल्यांची संख्या वाढत असल्याने जास्तीत जास्त टेस्टिंग होणे हा एकमेव पर्याय कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आहे. कॉर्न व्हायरसचा प्रादुर्भाव वाढतोय आणि अशावेळी मर्यादित टेस्टिंग करणं धोकादायक ठरू शकतं. 

याबद्दल बोलताना मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणतात, मुंबईतील टेस्टिंगचं प्रमाण राज्याच्या तुलनेने अधिक आहे. याशिवाय इतर जिल्ह्यांमध्ये मुंबईपेक्षा कमी टेस्ट केल्या जातायत. मात्र आता सर्व जिल्ह्यांमध्ये टेस्टिंग सुरु झाल्याचं ते म्हणतायत. 

आतापर्यंत 4.83 लाख टेस्ट :

महाराष्ट्रात कोविड 19 साठी एकूण 78 प्रयोगशाळा आहेत. यामध्ये आतापर्यंत 4.83 लाख टेस्ट केल्या गेल्या आहेत. त्यातील मुंबईत 2.02 लाख एवढ्या टेस्ट करण्यात आल्या आहेत. मुंबईत सुरुवातीपासूनच जास्तीत जास्त टेस्ट केल्या जात होत्या. आताही त्याच पद्धतीने टेस्ट केल्या जात आहेत. दरम्यान मुंबईत आणखी 16 नवीन लॅब्स वाढल्या असल्याची माहिती महापालिका प्रवक्ता डॉ. दक्षा शहा यांनी दिली आहे.

question mark on the count of tests conducted in mumbai read full news

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US National Debt : अमेरिकेवर कर्जाचा डोंगर! पहिल्यांदाच राष्ट्रीय कर्ज ४० ट्रिलियन डॉलर पार; जगातील महासत्तेसमोर मोठे आर्थिक संकट?

Congress Lok Sabha: लोकसभेच्या जागा २५ वर्षांसाठी गोठवा; काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची मागणी, देशातील आठशे शहरांत ‘छात्रों की गूंज’

मध्यप्रदेशातून बंदुका आणून ५० हजारांत विकणारा सांगलीचा तरूण जेरबंद! मध्यप्रदेशसह माढा, पंढरपूर, सांगोला, आटणी तालुक्यातील ८ जण अटक, १७ गावठी बंदुका जप्त, वाचा...

Maharashtra weather update : महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान नाही? कमी दाबाचे क्षेत्र गुजरातकडे; IMDचा अंदाज

Beed Municipal Council : बीड नगरपालिकेत ‘आपसातच’ जुंपली; ठरावातील फेरबदलावरून उपनगराध्यक्ष अन् सभापती भिडले

SCROLL FOR NEXT