Damai 2.jpg 
मुंबई

मोठा व्यवहार - मलबार हिलमध्ये एक हजार कोटी मोजून विकत घेतलं घर

सकाळवृत्तसेवा

मुंबई : डी मार्टचे संस्थापक राधाकृष्ण दमानी यांनी मलबार हिल भागात रेकॉर्ड ब्रेक किंमतीत घर खरेदी केले आहे. त्यांनी या भागात 5752.22 चौरस फूट घरासाठी तब्बल एक हजार कोटी रुपये मोजले आहेत. मुंबईतील मालमत्ता क्षेत्रातील ही महागडी डील मानली जात आहे. यापुर्वी पुनावाला ग्रूपचे संचालक सायरस पुनावाला यांनी लिंकन हाऊस 750 कोटी रुपयाला खरेदी केले होते.

मुंबईमधील मलबार हिलमध्ये मालमत्तेचे दर सर्वाधिक आहेत. बाजारभावानुसार या घराची किंमत 724 कोटी रुपये एवढी होती. राधाकृष्ण दमानी आणि त्यांचे भाऊ गोपीकिशन यांनी हे घर पुरचंद रॉयचंद आणि सन्स यांच्याकडून खरेदी केले आहे. यासाठी मुद्रांक शुल्कापोटी दमानी यांनी 30 रोटी रुपये मोजले आहेत. 31 मार्चला हा व्यवहार झाला.

कधी काळी एक रुममध्ये राहणाऱ्या दमानी यांनी व्यवसायात मोठी प्रगती केली. सध्या ते एव्हीन्यू सुपरमार्ट लिमीटेड कंपनीचे संचालक आहेत.  डी मार्टचे या लोकप्रिय मॉलचे संचलन या कंपनीमार्फत होते. फोर्बच्या यादीनुसार दमानी हे भारतातील चौथै श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची एकुण संपत्ती 15.4 अब्ज डॉलर एवढी आहे.

कोरोना संसर्गाच्या फटक्याने मालमत्ता क्षेत्राला मोठा फटका बसला होता. मात्र ऑक्टोंबरपासून मालमत्ता क्षेत्र नुसतेच सावरले नाही तर घर खरेदीत मोठ्या प्रमाणात वाढ  नोंदवली गेली. राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात दिलेली सवलतीचा मोठा परिणाम झाला. गेल्या वर्षी मुंबईने महिन्याकाठी घर खरेदीमध्ये 112 टक्के वाढ नोंदवली गेली.

कुठे आहे बंगला 
नारायण दाभोळकर मार्गावर हा दोन मजली बंगला असून, 1.5 एकर जमीनीवर ही मालमत्ता पसरली आहे.  एकूण बांधकाम क्षेत्रफळ 60 हजार चौरस फूट आहे. रेडी रेकनरच्या दरानुसार या मालमत्तेची किंमत 724 कोटी रुपये एवढी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli: गरज नसेल तर स्वतःहून बाजूला होतो! विराटचे धक्कादायक विधान, वारंवार सिद्ध करायला लावणे अयोग्य

Gold Rate Today: सोन्या-चांदीत मोठी घसरण! सोनं 11 हजार तर चांदी 30 हजारांनी स्वस्त; काय आहे ताजा भाव?

२-३ वर्षे तयारी, लाखो रुपये खर्च; पेपरफुटीने NEET परीक्षा रद्द, ३ विद्यार्थ्यांनी संपवलं आयुष्य

नागपूर-मडगाव एक्सप्रेस सुरू, विदर्भातून कोकणातं फिरायला जाणं झालं सोपं, जाणून घ्या मार्ग आणि वेळापत्रक

Latest Marathi News Live Update : मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; माणगाव, इंदापुरात वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT