Rahul Gandhi 
मुंबई

Rahul Gandhi: शिवसेना, राष्ट्रवादी फुटली मात्र काँग्रेस पक्ष फुटला नाही; राहुल गांधींचा पवार, ठाकरेंना टोला

Sandip Kapde

Rahul Gandhi:  काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टिळक भवन येथे काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना शिवसेना आणि राष्ट्रवादीला टोला लगावला. राहुल गांधी इंडिया बैठकीसांठी मुंबई दौऱ्यावर आले आहेत. इंडिया आघाडीची बैठक संपल्यानंतर त्यांनी पक्षाच्या एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित केले.

राहुल गांधी म्हणाले, महाराष्ट्रात काँग्रेस फुटली नाही. काँग्रेस हा एक विचारधारेचा पक्ष आहे. आमच्यात एकच डीएनए मिळेल. महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष आजही उभा आहे. कर्नाटकमध्ये भाजपचा पराभव कोणी केला?. आपल्या शरीरातील रक्त काढले तर एकच डिएनए असेल. तो कुणाला भीत नाही. हा काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे. हा बब्बर शेरचा पक्ष आहे. या पक्षात वाघिणी देखील आहेत.

भाजप, नरेंद्र मोदी आणि आरएसएसला काँग्रेस पक्षाची भीती वाटते. महाराष्ट्रात यांची सफाई होणार आहे. इंडिया आघाडी भाजपला हरवणार आहे. काँग्रेस पक्ष नक्की जिंकेल. जे कर्नाटकात झालं ते महाराष्ट्रात होईल, असे राहुल गांधी म्हणाले. 

राज्यात शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी मोठा बंड केला होता. त्यांनंतर दोन गट निर्माण झाले होते. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष चिन्ह शिंदे गटाला दिले आहे. एकनाथ शिंदे भाजपच्या मदतीने राज्यात मुख्यमंत्री झाले. शिंदे-भाजप सरकारला एक वर्ष झाल्यानंतर अजित पवार राष्ट्रवादीतून काही आमदारांसह सत्तेत सहभागी झाले. अजित पवार देखील पक्षावर आपला दावा सांगत आहे. महाराष्ट्रातील याच घडामोडीवरुन राहुल गांधीनी ठाकरे गट आणि शरद पवार गट यांना टोला लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

SCROLL FOR NEXT