अपघात sakal
मुंबई

Raigad: पाली-खोपोली महामार्गावर भीषण आपघात; एकाचा जागीच मृत्यू, महिला गंभीर

गुन्हा नोंदवण्यासाठी मनसे आक्रमक

राजेश नागरे

पाली : पाली-खोपोली राज्य महामार्गावर चिवे गावाजवळ लेक सिटी व म्युजिक सिटीच्या समोर गुरुवारी (ता. २९) दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला; तर मागे बसलेली महिला गंभीर जखमी झाली आहे.

पाली-खोपोली रस्त्याच्या दुरवस्थेमुळे हा अपघात झाल्याचा आरोप मनसे रायगड जिल्हा सचिव लता कळंबे यांनी केला असून यासाठी एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. लता कळंबे यांनी या मागणीचे निवेदन तहसीलदार उत्तम कुंभार व पाली पोलिस ठाण्यात मनसे पदाधिकारी व कायकर्त्यांसमवेत दिले.

रस्त्याच्या या सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साठते. त्यामुळे येथून दुचाकी गेल्यास दुचाकीस्वाराचा तोल जातो किंवा दुचाकी घसरते. तसेच चारचाकी वाहने गेल्यास वेगाने पाणी दोन्ही बाजूला उडते. अशा वेळी दुचाकी गेल्यास त्याच्यावर वेगाने पाणी उडते. त्‍या वेळी समोरचे काही दिसत नाही.

काचेवर पाणी उडल्याने चारचाकी वाहनचालक भांबावतो; तर दुचाकीस्वाराचा तोल जाऊन अपघात होतो. हा मार्ग अनेक ठिकाणी उंच-सखल आहे. परिणामी पाणी साठून अपघात घडत आहेत. त्‍यामुळे या महामार्गाची दूरवस्‍था झाली असल्‍याचे लता कळंबे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यात पुढील ५ दिवस हवामान बिघडणार! पुणे, नागपूरसह अनेक जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी; विभागाकडून सतर्कतेचं आवाहन

Pakistan Blast: पाकिस्तान पुन्हा हादरलं! शांतता रॅलीत भीषण स्फोट; १४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी, नेमकं काय घडलं?

प्रश्न कमी, परीक्षा आता एकाच शिफ्टमध्ये; NEET PG 2026 चे नवे नियम जाहीर, 'या' 5 गोष्टी जाणून घ्या...

FDA थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करते? तुकाराम मुंढेंनी कारवाईमागचं नेमकं कारणच सांगितलं! जाणून घ्या कायदा...

Gangaapur Accident: गंगापूर फाट्याजवळ उभ्या ट्रकला आयशरची जोरदार धडक; २५ वर्षीय चालक गणी शेख जागीच ठार

SCROLL FOR NEXT