चित्रकार चेतन पाशिलकर  sakal
मुंबई

Raigad : दिव्यांग चित्रकार चेतन पाशिलकरची सुवर्णभरारी

फ्रान्समध्ये १० व्या इंटरनॅशनल एबीलिंपिक्स स्पर्धेत यश

सकाळ वृत्तसेवा

पाली : सुधागड तालुक्यातील तळई या छोट्याशा गावातील दिव्यांग (कर्णबधिर) चित्रकार चेतन पाशिलकर याने भारत देशाचे नाव उंचावले आहे. फ्रान्समध्ये झालेल्या १० व्या इंटरनॅशनल एबीलिंपिक्स चित्रकला स्पर्धेत रविवारी (ता. २६) त्याने सुवर्णपदक पटकावले आहे.

सुप्रसिद्ध चित्रकार चेतन चंद्रकांत पाशिलकर यांनी शारीरिकदृष्ट्या असलेल्या आवाहनांना जिद्दी व चिकाटीने पेलत चित्रकलेच्या दुनियेत; याबरोबरच अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करून आमुलाग्र कामगिरी केली आहे.

फ्रान्समध्ये नुकत्याच १० व्या इंटरनॅशनल एबीलिंपिक्स चित्रकला स्पर्धेत चेतनने भारताचे प्रतिनिधित्व केले आणि सुवर्णपदक पटकावले. यामुळे चेतन याने महाराष्ट्रासह देशाचे नाव उंचावले आहे. त्यामुळे त्यांच्यावर सुधागड तालुक्यासह भारतातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

चेतन पाशिलकरचा थक्क करणारा प्रवास

जन्मापासून श्रवण दोष असल्यामुळे त्याचे शिक्षण शारीरिकदृष्ट्या आव्हान असलेल्या शाळेमध्ये पूर्ण झाले आहे. मात्र, चित्रकला हे चेतनच्या भावनेचे माध्यम बनले आणि सभोवतालच्या लोकांकडून चांगली दाद आणि प्रेरणा मिळाली.

त्यानंतर एसएससी आणि जीडी आर्ट डिप्लोमा, बी.एफ.ए. पेंटिंग कला शाखा पुणे विद्यापीठातून पूर्ण केले. पुढे शिक्षण चालू ठेवत एमएफए चित्रकला पदवी प्रथम श्रेणीने जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स मुंबई विद्यापीठातून पूर्ण केली. शिकत असतानाच त्याला १०५ हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत.

त्यामध्ये १० सुवर्णपदके, २६ इतर पदके, ३० चषक आणि ११५ हून अधिक प्रमाणपत्र यांचा समावेश आहे. २०१८ मध्ये राष्ट्रीय एबीलिंपिक्स दिव्यांगांसाठी असलेल्या स्पर्धेमध्ये चेतन यांनी भारत देशाकडून सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले. त्याच्या काही पेंटिंग्स भारतीय सैन्य दलातील एनएसजी कमांडोज यांना समर्पित केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

Latest Marathi News Live Update : तुळजापूरमध्ये पोलिस आणि भाविकांमध्ये वाद

मोठे अपडेट्स : IPL मध्ये १० नव्हे १२ संघांमध्ये जेतेपदाची स्पर्धा रंगणार? BCCI चा मास्टर प्लान, शंभरच्या आसपास लढती होणार...

'दारु प्यायचो, मासांहार करायचो, दिवसाला 200 सिगारेट ओढायचो' अमिताभ बच्चन यांनी केलेला खुलासा, म्हणालेले...'इतकी दारू प्यायचो की...'

2011 World Cup India Team: २०११ फायलनच्या भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधील हिरो आत्ता काय करतात, दोन खेळाडू अद्यापही IPL खेळतात

SCROLL FOR NEXT