पाली ग्रामपंचायत
पाली ग्रामपंचायत 
मुंबई

पालीत सभेवर अपक्षांचा बहिष्कार

सकाळ वृत्तसेवा

पाली : सुधागड तालुक्‍यात पाली ग्रामपंचायतीची मासिक सभा सोमवारी आयोजित करण्यात आली होती. मात्र, या सभेवर अपक्ष उपसरपंचासह ११ सदस्यांनी बहिष्कार टाकला. गेल्या आठवड्यात अपक्ष सरपंच गणेश बाळके यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश करीत लाल बावटा खांद्यावर घेतला आहे. परिणामी अपक्षांनी अवघ्या काही महिन्यांत पालीत केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कामावर पाणी फिरून ग्रामपंचायत कारभारात पक्षीय हस्तक्षेप वाढणार असल्यामुळेच या सभेवर बहिष्कार टाकण्यात आला आहे. 

पाली ग्रामपंचायतीचे काम, येथील समस्यांचे निराकरण आणि इतर सर्व बाबी व्यवस्थित असताना सरपंचांनी शेकापमध्ये पक्ष प्रवेश का केला? असा प्रश्‍न उपसरपंच विजय मराठे यांच्यासमवेत ११ अपक्ष उमेदवारांनी उपस्थित केला. पालीतील जनता अपक्षांच्या पाठीशी उभी आहे. मात्र, सरपंचांच्या शेकाप प्रवेशामुळे इथे पक्षीय राजकारण आल्याने पालीकरांचा विश्‍वासघात झाल्याचा समज आहे. त्यामुळेच आम्ही मासिक सभेवर बहिष्कार टाकल्याचे त्यांनी सांगितले. 

घोडेबाजार यशस्वी 
पाली ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर होण्यामुळे अनेक अडचणी येत आहेत. पाली नगरपंचायत स्थापन व्हावी, यासाठी सप्टेंबरमध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीवर राजकीय पक्षांनी बहिष्कार टाकला होता. मात्र, अपक्षांनी निवडणूक लढविली आणि ग्रामपंचायतीवर अपक्षांची सत्ता आली. न्यायालयाच्या नगरपंचायत प्रक्रिया सुरू करण्याच्या निर्णयानंतरदेखील कित्येक महिने याबाबत कुठलीच सकारात्मक हालचाल झालेली नाही. त्यामुळे सत्तेपासून दूर राहिलेले राजकीय पक्ष धास्तावले होते. ग्रामपंचायत सरपंच, सदस्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी विकास कामांसाठी निधी आणू, सरकारच्या विविध योजना राबवू, अशी प्रलोभने दाखवून सत्ता प्रस्थापित करण्यासाठी अनेकांची धडपड सुरू आहे. यात पाली ग्रामपंचायतीच्या घोडेबाजारात सरपंच गळाला लागले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : दोन धक्क्यानंतर यशस्वी, रियाननं डाव सावरला; राजस्थान 10 षटकात शतक पार

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT