पोलिसांचे श्रमदान
पोलिसांचे श्रमदान 
मुंबई

खालापुरात रस्ता दुरुस्तीसाठी पोलिसांचे श्रमदान 

सकाळ वृत्तसेवा

खालापूरः तालुक्‍यातील सर्वच प्रमुख रस्त्यांची दुरवस्था झाली असून, ठेकेदार पाऊस थांबण्याची वाट पाहत थांबला असला तरी खालापुरातील खाकी वर्दी मात्र संभाव्य जीवघेणे अपघात टाळण्यासाठी रविवारी रात्री रस्त्यावर उतरली. या वेळी हातात दंडाची पावती नाही तर घमेले, फावडे होते.

खोपोली-पेण राज्यमार्ग आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला जोडणारा महत्त्वाचा खालापूर-पेण बाह्यमार्गाची उताराचा रस्ता आणि रस्त्याला दोन फुटापेक्षा जास्त खोल पडलेले खड्डे यामुळे दुचाकीसह मोठ्या अवजड वाहनांचा प्रवास धोकादायक झाला होता. दर वर्षी खड्ड्यांमुळे या ठिकाणी अपघात होऊन जीव गेल्याच्या घटना घडल्या आहेत.

सध्याच्या पावसाने तर खड्ड्याचा वाढता आकार पाहून तर अनेकांनी धास्ती घेतली होती. खालापूर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित बाब पोलिस निरीक्षक विश्‍वजित काईंगडे यांना सांगितली. कोणत्याही क्षणी अपघात होऊ शकतो, अशी कल्पना दिल्यानंतर खालापूर पोलिस निरीक्षक विश्‍वजित काईंगडे यांनी वर्दळ कमी असताना रविवारी रात्री पोलिस कर्मचारी घेत खालापूर-पेण बाह्यमार्ग गाठला. स्थानिकांना जमेल तशी मशनरी आणि खडीची व्यवस्था करण्याचे आवाहन केले.

पोलिस स्वतः अशाप्रकारे काम हाती घेत आहेत, हे पाहून खालापूर तालुक्‍यातील मदतीसाठी सदैव आघाडीवर असलेला गुरुनाथ साठेलकर यांचा अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी ग्रुप मदतीसाठी धावला. वडवळचे जितेंद्र सकपाळ, गुरुनाथ साठेलकर, जितेंद्र रावळ, अमोल कदम, हनिफ कर्जीकर, मितेश शहा पोलिसांच्या मदत कार्यात पोहचले. धो-धो पावसात खड्डे बुजविताना केवळ खडीचा उपयोग होत नाही, हे पाहून पेव्हर ब्लॉक टाकून खड्डे बुजविण्यात आले. तात्पुरत्या स्वरूपात काम झाले असले तरी मोठा अपघात टळणार आहे याचे समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिक-चावलाने पाडलेलं हैदराबादच्या फलंदाजीला खिंडार, पण कॅप्टन कमिन्स फटकेबाजीने मुंबईसमोर 174 धावांचं लक्ष्य

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT