कशेडी घाटात मंगळवारी टँकर उलटला. त्‍यामुळे या मार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्‍प झाली होती.
कशेडी घाटात मंगळवारी टँकर उलटला. त्‍यामुळे या मार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्‍प झाली होती. 
मुंबई

कशेडी घाटात टॅंकर उलटला 

सकाळ वृत्तसेवा

पोलादपूर : मुंबई-गोवा महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच असून पोलादपूरनजीक कशेडी घाटात खेडकडे जाणारा टॅंकर अवघड वळणावर उलटला. ही घटना धामणदेवी गावाच्या हद्दीत मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता घडली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाट महत्त्वाचा मानला जातो. मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता टॅंकरचालक संग्राम नामदेव मोरे (वय 49, रा. लातूर) यांचे अवघड वळणावर टॅंकरवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे धामणदेवी गावाच्या हद्दीत टॅंकर पलटी झाला. या घटनेत सुदैवाने चालक मोरे यांना कोणतीही दुखापत झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

या घटनेची माहिती समजताच कशेडी महामार्ग पोलिस मदत केंद्राचे सहायक फौजदार बोडकर यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. त्यानंतर या महामार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune School: स्कॉरलशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

MI Playoff Scenario : 8 सामने हरल्यानंतरही मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाऊ शकते का? समजून घ्या समीकरण

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट

Sharad Pawar on Narendra Modi: नरेंद्र मोदींनी कुठं कुटुंब सांभाळलं... शरद पवारांचा पलटवार! नेमकं काय म्हणाले?

Raj Thackeray: शोले, गांधी अन् शक्ती.. राज ठाकरेंना कसं लागलं चित्रपटांचं वेड? बिग बींच्या 'त्या' सीनबद्दल म्हणाले...

SCROLL FOR NEXT