खालापूर : बिबट्याच्या पायाचे ठसे.
खालापूर : बिबट्याच्या पायाचे ठसे. 
मुंबई

खालापूरमधील नावंढे गावात बिबट्याचे दर्शन

सकाळ वृत्तसेवा

खालापूर : खालापूर तालुक्‍यातील नावंढे गावात बिबट्याने दर्शन दिल्यामुळे सोमवारी एकच खळबळ माजली आहे. त्यामुळे नावंढे गावात वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी तळ ठोकून आहेत. बिबट्याच्या पायाचे ठसे घेण्यात आले असून तो  अंदाजे चार ते पाच वर्षांचा असण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. 

खालापूरनजीक नावंढे गावात केळवली रेल्वे स्थानकाजवळील रस्त्यावर रवी हाडप यांना सोमवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाले. 
या वेळी बिबट्याला चाहूल लागल्याने तो गवतात लपून बसला. या घटनेची माहिती हाडप यांनी खालापूर वन विभागाचे अधिकारी आर. व्ही. नागोठकर यांनी दिली. त्यानंतर वन विभागाचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याच्या पायाचे ठसे घेण्यात आले असून अंदाजे चार ते पाच वर्षांचा असण्याची शक्‍यता वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्‍त केली.

बिबट्या दिसल्याची माहिती गावात पसरताच ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. दिवसा ढवळ्या लोकवस्तीनजीक बिबट्या आल्याने भीतीचे वातावरण असून हा रस्ता रहदारीचा आहे. शाळकरी मुले, ग्रामस्थांची येथे उशिरापर्यंत वर्दळ असते. त्यामुळे वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची आवश्‍यकता असल्याची नावंढे येथील ग्रामस्थ किरण हाडप यांनी मागणी केली.

भक्ष्याच्या शोधात बिबट्या गावात आल्याची शक्‍यता आहे. वाढलेल्या गवतामुळे बिबट्या नेमका कुठे लपून बसला आहे, याचा अंदाज येत नाही. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नावंढे गावात वन विभाग तळ ठोकून राहणार आहे. ग्रामस्थांनीही खबरदारी घ्यावी.
- आर. व्ही. नागोठकर, वनाधिकारी, खालापूर

पोिलस कर्मचाऱ्यांनीही बिबट्या पाहिला. ग्रामस्थांची चाहूल लागताच बिबट्याने पळ काढला. बिबट्याने वाढलेल्या गवतात पळ काढला असून तो पुन्हा येऊ नये, यासाठी उपाययोजना करणे आवश्‍यक आहे.
- रवी हाडप, नावंढे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT