दिवेआगर
दिवेआगर 
मुंबई

दिवेआगरमध्ये पर्यटकांना सोईसुविधा 

सकाळ वृत्तसेवा

श्रीवर्धनः शौचालयासह विविध सोईसुविधांअभावी दिवेआगर समुद्रकिनारी येणाऱ्या पर्यटकांची नेहमी गैरसोय होत होती. त्यामुळे अनेकदा पर्यटक नाक मुरडायचे; मात्र आता त्यांची गैरसोय दूर झाली आहे. निर्मल सागर तट अभियानांतर्गत दिवेआगर येथे पर्यटकांना किमान सुविधा मिळण्यासाठी ग्रामपंचायतीने समुद्रकिनाऱ्यावर खुली व्यायामशाळा, लॉकर, चेंजिंग रूम, स्वच्छतागृह अशा सोईसुविधा उपलब्ध करून दिल्या आहोत. त्यामुळे स्थानिकांसह पर्यटकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
 
जिल्ह्याला विस्तीर्ण व निसर्गरम्य समुद्रकिनारा लाभला आहे. जलक्रीडा प्रकल्पाचा आनंद घेणे, स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेणे, किनाऱ्यावर येणाऱ्या देशी-विदेशी पक्ष्यांचे छायाचित्रण करणे आदींसाठी तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. यामध्ये पुरुष, स्त्री, लहान मुले, वयोवृद्धांचा समावेश असतो. सुवर्णगणेशाच्या पदस्पर्शाने पावन झालेले दिवेआगर हे समुद्रकिनारी वसलेले, निसर्गसौंदर्याने नटलेले व ऐतिहासिक वारसा लाभलेले गावे आहे.

विस्तीर्ण समुद्रकिनारा, पुरातन मंदिरे, किनाऱ्याजवळील नारळ-पोफळीच्या बागा, त्यामधील कौलारू घरे पर्यटकांना आकर्षित करतात. पर्यटकांचा ओघ पाहता सोई-सुविधा अपुऱ्या असल्याने पर्यटकांना मर्यादा येत होत्या. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडून निर्मल सागर तट अभियानांतर्गत दिलेल्या आदेशानुसार दिवेआगर येथे ग्रामपंचायतीने समुद्रकिनाऱ्यावर विविध सोई-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. 

ग्रामपंचायतीला सूचना 
स्वच्छतागृह स्वच्छ, नीटनेटके व पर्यटकांसाठी नेहमी खुले राहतील याची दक्षता घेण्यात यावी. दिवेआगर समुद्रकिनारी बांधलेल्या शौचालयांना पाणीपुरवठा करण्याची सोय करावी. सीसीटीव्ही आणि पथदिव्यांची नियमित देखभाल दुरुस्ती करणे व ते नेहमी कार्यान्वित राहतील, याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीला दिल्या आहेत. 

समुद्रकिनाऱ्यावर प्रायोगिक तत्त्वावर प्लास्टिकपासून इथेनॉलनिर्मितीचा प्रकल्प उभारण्याचा ग्रामपंचायतीचा मानस आहे. त्यामुळे त्याबाबतचा सविस्तर अहवाल व खर्चाचे अंदाजपत्रक सादर करण्याची तसेच समुद्रकिनारी ब्ल्यू फ्लॅग करण्यासाठी समुद्राच्या पाण्याच्या नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत. 
- बाळकृष्ण बापट, सरपंच, दिवेआगर ग्रुप ग्रामपंचायत 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT