जवला 
मुंबई

अबब... 25 टन जवला 

सकाळ वृत्तसेवा

अलिबागः मासेमारीच्या चढ-उतारानंतर मच्छीमारांच्या जाळ्यात आता सुमारे 25 टन जवला आला आहे. हा जवला सुकविण्याची लगबग सुरू झाली आहे. यामुळे दीडशेहून अधिक जणांना रोजगारही मिळाला आहे.

मोदींची पुन्हा तुलना छत्रपतींशी
 
कोळीवाड्यात बेरोजगार महिला व तरुणांना विशेष करून आदिवासी समाजातील तरुणांना मासळी सुकविणे, खळी तयार करण्याची कामे मिळतात. या कामांतून त्यांना रोजगाराचे साधन उपलब्ध होते. या रोजगारातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यास मदत होते. जिल्ह्यातून काही बोटी मासेमारीसाठी गेल्या होत्या. या आठवड्यात ओला जवला मासेमारीच्या जाळ्यात सापडला. अलिबाग बंदरापासून अनेक बंदरांमध्ये जवला बोटीतून काढण्याचे काम करण्यात आले. सुमारे 25 टन जवला मिळाल्याचे मच्छीमारांकडून सांगण्यात आले. 

जवला सुकविण्याचे काम सुरू झाले आहे. जवला सुकवून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावून मोठ्या बाजारासह स्थानिक बाजारात विकण्यासाठी पाठविण्यात येणार आहे. दोन दिवसांत हा जवला सुकून बाजारात विक्रीसाठी पाठविला जाईल. सुकविण्यापासून तो सुटा करण्यापर्यंतचे काम करण्यासाठी प्रत्येक खळीच्या ठिकाणी तीन कामगार काम करीत आहेत. 150 हून अधिक कामगार 500 रुपये मजुरीवर काम करीत आहेत. यातून या कामगारांना रोजगार प्राप्त झाला आहे. जवला सुकवून दोन दिवसांत बाजारात पाठविण्यात येईल. दीडशे रुपये किलोने जवला विकण्यात येणार आहे, असे मच्छीमारांनी सांगितले. 

गेल्या आठ दिवसांत सुमारे 25 टन ओला जवला समुद्रातून आणण्यात आला. तो जवला सुकविण्याचे काम सुरू आहे. जवला सुकवून तो सुमारे दीडशे रुपये किलोने बाजारात विक्रीसाठी पाठविण्यात येणार आहे. 
- शेषनाथ कोळी, अध्यक्ष, 
जिल्हा मच्छीमार संघ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Bank Holiday: बँकेची कामं आजच करा! चार दिवस बँका राहणार बंद? कधी पासून जाणून घ्या

Duleep Trophy Final: ३० चौकार अन् ७ षटकार... ईशान किशन बरसला, पण त्रिशतक हुकलं; संघाच्या तब्बल ७०० धावा पार

आई म्हणाली ‘चॉकलेट बंद कर’; स्क्वॉशपटू अनाहतने थेट न्यूट्रिशनिस्टलाच फोन केला! नेमकं काय घडलं? Viral Video

नालासोपारा शहराचे नाव बदलणार, प्राचीन ऐतिहासिक वारशाला नवी ओळख मिळणार; महापालिकेचे महत्त्वाचे पाऊल

SCROLL FOR NEXT