फलक झुडपांत 
मुंबई

कर्जतमध्ये पार्किंग फलक झुडपांत 

सकाळ वृत्तसेवा

नेरळः कर्जत शहरातील वाहतूक समस्या दररोज सर्वांच्या त्रासाचा विषय बनली आहे. वाहतूक सुरळीत राहावी यासाठी टोईंग व्हॅन काम करीत आहे. त्याचवेळी शहरात सम आणि विषय असे दिवस सर्व रस्त्यांवर वाहने पार्किंग करण्यासाठी ठरवून दिले आहेत. असे असतानाही वाहतूक कोंडी शहराची समस्या बनली आहे; पण शहरात रस्त्यावरील पार्किंगची माहिती देणारे फलक पावसाळ्यात वाढलेल्या झुडपांत हरवून गेले आहेत. त्यामुळे रस्त्यावर अनधिकृत वाहने उभी करून जाण्याचे प्रमाण वाढले आहे.

अल्पवयीन मुलीशी चाळे करणारा अटकेत
 
कर्जत शहरात गेल्या काही वर्षांत वाहनांची वर्दळ वाढली आहे. शहरातील रस्ते मोठे आणि रुंद झाले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढले आहे. वाहने रस्त्यावर लावली जात असल्याने बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या दुकानात ग्राहक फिरकत नसल्याने त्यांच्या व्यवसायावरही कोंडीचा आणि बेशिस्त पार्किंगचा फटका बसत आहे. वाहतूक नियमावलीनुसार शहरात दुचाकी वाहनांची पार्किंग शहरातील पालिकेच्या मालकीच्या सर्व रस्त्यांवर राबविली जात आहे. त्यासाठी सर्व रस्त्यांवर ठराविक अंतर सोडून सम आणि विषम तारखेला पार्किंग करण्याबाबत जाहीरपणे फलक लावून कळविले होते; पण तेच नामफलक झुडपांत गडब झाले आहेत. पावसाळ्यात वाढलेली गवताची झाडे आजही आहेत तशी आहेत. त्यामुळे वाहने कोठे लावावीत असा प्रश्‍न पडत आहे. याबाबतची माहिती पालिकेला नाही. त्याचा फटका शहरात वाहतूक कोंडी होण्यावर होत आहे. 

बाजारपेठेत दररोज कुठेही वाहने लावली जात असून, त्यामुळे वाहतूक कोंडी तर होतेच; परंतु आमच्यासारख्या लहान व्यावसायिकांच्या दुकानात कोणी फिरकत नाही. वाहतूक समस्यांवर मात करण्यासाठी पालिकेने अनेक सुधारणा केल्या आहेत; मात्र त्यांची अंमलबजावणी कठोरपणे करण्याची गरज आहे. 
- विशाल जोशी, नागरिक 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, Test : एकदिवस आधी रिटायर्ड हर्ट झाला, दुसऱ्या दिवशी फलंदाजीला उतरला... पण KL राहुलचं शतक थोडक्यात हुकलं!

Pune Restrictions: महत्त्वाची बातमी! पुण्यात १८ ते ३१ ऑगस्टपर्यंत जमावबंदी; कोणत्या गोष्टींवर असणार बंदी अन् का? जाणून घ्या...

Amit Shah: सोनिया गांधींच्या 'त्या' कृतीवर अमित शाह संतापले! चित्तोडगडमधून साधला निशाणा; म्हणाले, देशाची माफी मागा...

Nagpur Police Endlife: नागपूरमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षकाची साडीने गळफास घेऊन जीवन संपविले; पोलिस दलात खळबळ, कारणांचा तपास सुरू

LPG Supply: स्वयंपाकाच्या गॅसवर केंद्राचा मोठा निर्णय! २१ कंपन्यांसाठी LPG उत्पादनाचा कोटा निश्चित; केंद्राची नवी रणनीती

SCROLL FOR NEXT