raigad sakal
मुंबई

Raigad Ganeshotsav : बसस्‍थानकात परतीची झुंबड

एसटी महामंडळाकडून ४५० विशेष गाड्या

सकाळ वृत्तसेवा

अलिबाग - एसटी बस, कोकण रेल्वेचे बुकिंग हाऊसफुल झाल्याने रायगड जिल्ह्यातील चाकरमान्यांचा मजल-दरमजल करीत परतीचा प्रवास सुरू झाला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाकडून सुमारे ४५० एसटी बस मागवण्यात आल्या होत्या, बहुतांश बसचे बुकिंग फुल झाल्याने प्रवाशांनी मुंबई, ठाणे, पालघर, सुरत या भागात परत जाण्यासाठी मिळेल त्या वाहनाचा आधार घ्यावा लागत आहे.

सर्वाधिक गैरसोय महाड, माणगाव, श्रीवर्धन, रोहा या तालुक्यातील प्रवाशांची होते. कोकण रेल्वेचे रोहा, माणगाव, महाड असे काही मोजकेच थांबे आहेत. या थांब्यावर लांब पल्ल्याच्या रेल्वे थांबतच नाहीत. काही गणपती विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या आहेत. त्यांचेही बुकिंग फुल झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहे.

राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन ४५० बस तळा, श्रीवर्धन, माणगाव, पोलादपूर, महाड, रोहा आगारांत पाठवल्या होत्या. या बस रविवार आणि सोमवार अशा दोन दिवस चालणार आहेत. त्यांचीही बुकिंग फुल झाले आहे. शनिवारी (ता. २३) गौरीसह पाच दिवसांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन झाल्यानंतर बहुतांशी चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागले.

अलिबाग, पेण, पाली या तालुक्यातून एसटीला गणेशोत्सवात फारसा प्रतिसाद नव्हता; मात्र, दक्षिण रायगडमधून परतीच्या प्रवासासाठी एसटीची सर्वाधिक मागणी होती, त्या मागणीनुसार दोन दिवसांसाठी ४५० बस पुरवण्यात आल्या आहेत. या सर्व बसचे आगाऊ बुकिंग झाले आहे. गणेशभक्तांचा परतीचा प्रवास सुखकारक व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

दीपक गोडे, विभागीय वाहतूक नियंत्रक, रामवाडी

गावाकडे आल्यानंतर परतीचा प्रवास कोणत्या दिवशी करायचा, हे नक्की नव्हते. श्रीवर्धन येथून रविवारी रात्री निघण्यासाठी एक खासगी गाडी बुक केली होती; परंतु ती गाडी सोमवारपर्यंत येणार नाही, सोमवारी सकाळी कामावर कोणत्याही परिस्थितीत जायचे आहे. यामुळे एसटीने माणगाव येथे जाण्याचा निर्णय घेतलाय. तेथून मुंबईच्या दिशेने जाणारे जे वाहन मिळेल, त्यातून दोन मुले आणि आम्ही नवरा-बायको जाणार आहोत.

संतोष मांडवकर, श्रीवर्धन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT