smoking in train news sakal
मुंबई

Railway: रेल्वेत सिगरेटचे सेवन करत असाल तर सावधान! तब्बल इतक्या प्रवाशांवर कारवाई

Railway: २००३ अंतर्गत गुन्ह्यांची ८४ प्रकरणे नोंदवली त्यांच्या मार्फत १६ हजार ८०० रुपये दंड वसूल केला आहे. त्या तुलनेत नोव्हेंबर २०२२ मध्ये ७६ प्रकरणांतून १५ हजार २०० रुपये दंड वसूल केला आहे.

Chinmay Jagtap

Railway: धावत्या रेल्वेगाड्या किंवा रेल्वे परिसरात सिगारेट तसेच अन्य तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्यांविरुद्ध मध्य रेल्वेकडून नेहमीच कारवाई केली जाते. मध्य रेल्वेने गेल्या आठ महिन्यात १,१५० जणांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून ४.९६ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. रेल्वे कायद्यानुसार धावत्या रेल्वे गाड्या तसेच रेल्वेस्थानक

परिसरात तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणे, सिगारेट ओढणे याला बंदी आहे. मात्र, तरीही अनेक प्रवासी त्याकडे दुर्लक्ष करून नियमाचे सर्रास उल्लंघन करीत असतात. याचा अन्य प्रवाशांना त्रास तर होतोच; शिवाय सिगारेटमुळे गाडीत आग लागण्याचाही धोका असतो.त्यामुळे रेल्वेकडून अशा प्रवाशांवर लक्ष असून त्यांच्यावर नियमितपणे कारवाई केली जाते.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या रेल्वे सुरक्षा दलाने भारतीय रेल्वे कायदा कलम १४५ अंतर्गत सिगारेट व इतर तंबाखूजन्य १,१५० प्रकरणे नोंदवली असून त्यांच्याकडून ४.९६ लाख रुपये दंड वसूल केला आहे. एकट्या नोव्हेंबर महिन्यात मध्य रेल्वेच्या आरपीएफ पोलिसांनी मुंबई विभागात सिगारेट व इतर तंबाखू उत्पादने कायदा-२००३ अंतर्गत गुन्ह्यांची ८४ प्रकरणे नोंदवली त्यांच्या मार्फत १६ हजार ८०० रुपये दंड वसूल केला आहे. त्या तुलनेत नोव्हेंबर २०२२ मध्ये ७६ प्रकरणांतून १५ हजार २०० रुपये दंड वसूल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'माझ्याशी लग्न करशील?' शाहरुखने लग्नाच्या 15 वर्षानंतर प्रियंका चोप्राला लग्नासाठी घातलेली मागणी, प्रपोजल ऐकून थक्क झाली प्रियंका

Vastu Tips: माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय करावे, वाचा वास्तुशास्त्र काय सांगत

Latest Marathi News Update : पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात पुन्हा अपघात,दोघांचा मृत्यू

Whale Vomit 3 Crore : बाप रे! तब्बल ३ कोटींची व्हेलच्या उलटीची तस्करी, माशाची उलटी एवढी महाग का?

India vs Australia: जॉश हेझलवूडची अनुपस्थिती पथ्यावर? भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आज होबार्टमध्ये तिसरा टी-२० सामना

SCROLL FOR NEXT