मुंबई

Railway Crime: आरपीएफकडून चोरट्यांची धरपकड; तीन दिवसात ५ चोरट्यांना अटक!

उपशीर्षक: आरपीएफची सक्रिय कारवाई; रेल्वे चोरट्यांच्या टोळीवर कडक धडा!

सकाळ वृत्तसेवा

Mumbai Crime: सिएसएमटीचा स्वछतागृहातून नळ चोरी झाल्याच्या घटनेनंतर आता मध्य रेल्वेच्या आरपीएफ पोलिसांनी रेल्वे साहित्य आणि प्रवाशांचे सामना चोरी करणाऱ्या चोरट्यावर कारवाई अभियान सुरु केले आहे.

गेल्या तीन दिवसात वडाळा रोड,अंबरनाथ आणि कल्य़ण स्थानकात चोरी करणार्‍या ५ चोरटयांना अटक केली.

मध्य रेल्वचा उपनगरीय लोकलमधून दररोज ३५ लाखापेक्षा जास्त प्रवासी प्रवास करते. प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासांची आणि रेल्वेच्या मालमत्तेच्या सुरक्षेची जबाबदारी रेल्वे सुरक्षा दलावर (आरपीएफ) आहे.

मात्र, गेल्या काही दिवसांपासुन रेल्वे मालमत्ता आणि प्रवाशांना सामान चोरीच्या घटना वाढल्या आहे. त्यामुळे आता मध्य रेल्वेच्या आरपीएफ पोलिसांनी चोरट्यावर लक्ष ठेवत धरपकड सुरु केली आहे.

बुधवारी १४ फेब्रुवारी रोजी आरपीएफ पोलिसांनी वडाळा रोडवरून कुर्ल्याकडे जाणार्‍या एका संशयित व्यक्तीचा पाठलाग केला कुर्ला स्थानकात उतरुन पळून जात असताना त्याला पकडण्यात आले. त्याचे नाव रिझवान शेख असून चौकशीत एका प्रवाशाचा २२ हजार ९९९ रुपयांचा मोबाईल फोन चोरल्याची कबुली दिली.

गुरुवारी अंबरनाथ स्थानकातील आरपीएफ कर्मचाऱ्यांनी ठाण्याला जाणाऱ्या लोकलमधून उतरून पळून जाण्याचा प्रयत्न करत असलेल्या आरोपीला पकडले. दिपक वाघरी नावाच्या आरोपीने चौकशीत प्रवाशांचा मोबाईल चोरल्याची कबुली दिली.त्याच्याकडून २ रिअलमी मोबाईल जप्त करण्यात आले.

तर कल्याण स्थानकात दशरथ ठाकूर नावाच्या आरोपीला अटक केली आहे. त्याच्या चौकशीत कल्याण स्थानकात प्रवाशांचे मोबाईल फोन चोरल्याची कबुली दिली . याशिवाय भुसावळ स्थानकात दोन चोरट्यांकडून दोन मोबाईल जप्त करण्यात आले. सर्व आरोपींना भारतीय दंड संहितेच्या कलम ३७९ अन्वये खटला चालवण्यासाठी लोहमार्ग पोलिसांकडे ताब्यात दिले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT