CSMT to Dhule new Express will run from today railway marathi news esakal
मुंबई

Railway: खान्देशातून मुंबईत येणं झालं अजूनच सोप्पं; आज पासून धावणार नवीन रेल्वे, काय आहे वेळापत्रक? वाचा

सकाळ डिजिटल टीम

Railway: मुंबई ते धुळे नवीन ट्रेन चालवण्याची घोषणा मध्य रेल्वेने केली आहे. आजपासून (ता. १२) ही गाडी सुरू होणार आहे. तसेच पुणे भुसावळ एक्स्प्रेस १३ नोव्हेंबरपासून दौंड कॉर्ड लाईन मार्गे, अहमदनगर आणि मनमाडमार्गे अमरावतीपर्यंत वाढवली. त्यामुळे मुंबई ते धुळे आणि पुणे ते अमरावतीदरम्यान प्रवास करणे सोयीचे होणार आहे.

ट्रेन क्रमांक ११०२५ / ११०२६ पुणे-भुसावळ एक्स्प्रेसचा विस्तार १३ नोव्हेंबरपासून अमरावतीपर्यंत दौंड कॉर्ड लाइनमार्गे, अहमदनगर आणि मनमाडमार्गे वळवून करण्यात येणार आहे. ट्रेन क्रमांक ११०११/ ११०१२ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-धुळे एक्स्प्रेस ही नवीन ट्रेन देखील सुरू करण्यात येत आहे.

ट्रेन क्रमांक ११०२५ पुणे - अमरावती एक्स्प्रेस १३ नोव्हेंबरपासून पुणे येथून सकाळी ११.०० वाजता सुटेल आणि अमरावती येथे दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १२.५५ वाजता पोहोचेल. ट्रेन क्रमांक ११०२६ अमरावती-पुणे एक्स्प्रेस १३ नोव्हेंबरपासून अमरावती येथून रात्री १०. ५० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ११.२५ वाजता पोहोचेल. ही गाडी दोन्ही दिशेने उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, बेलापूर, कजगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, बोदवड, मलकापूर, नांदुरा, शेगाव, अकोला, बडनेरा स्थानकावर थांबणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDC drugs ban: मोठा निर्णय! केंद्राकडून १६ प्रकारच्या‘एफडीसी’ औषधांवर बंदी; 'या' मेडिसिन्सचा समावेश

Aditya Thackeray: ''गेलेल्यांना माघारी यायचं असेल तर...'' उद्धव ठाकरेंचा निरोप देत, आदित्यंचं मोठं विधान, काय म्हणाले?

Rohit Sharma चं टेन्शन वाढणार... कर्णधार शुभमन गिलने अफगणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर दिलाय इशारा

Wani Dog Attack : वणी शहरात पिसाळलेल्या कुत्र्याचा कहर; दोन दिवसांत ३३ जण जखमी, नागरिक दहशतीत ग्रामपालिकेकडे तात्काळ कारवाईची मागणी

Vani News : मंडपाचा पाईप विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने मंडप व्यावसायीक तरुणाचा मृत्यू...

SCROLL FOR NEXT