मुंबई

Mumbai Local News: रेल्वेने घेतलेल्या या निर्णयामुळे 'फलाट' करतायेत गर्दीमुक्तीच्या दिशेने वाटचाल

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News: रेल्वे फलाट गर्दीमुक्त करण्यासाठी मध्य रेल्वेने कुर्ला, कल्याण, डोंबिवली आणि वडाळा रोड रेल्वे स्थानकांवरील खाद्यपदार्थ स्टॉल हटवण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे. प्रस्तावाला मंजुरी मिळताच खाद्यपदार्थ स्टॉल हटवण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ला दिली आहे.

मध्य रेल्वेच्या प्रमुख उपनगरी रेल्वे स्थानकातील गर्दी गेल्या काही दिवसांपासून रेल्वेची मोठी डोकेदुखी ठरत आहे. या गर्दीमुळे चेंगराचेंगरीची घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेल्वे फलाट गर्दीमुक्त करण्यासाठी मध्य रेल्वे मुंबई विभागाच्या अधिकाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी अनेक स्थानकांत पाहणी केली. या पाहणीत रेल्वे फलाटांवरील खाद्यपदार्थ स्टॉल जागा व्यापण्याचे काम करत असल्याचे निदर्शनात आले.

प्रवाशांना रेल्वे स्थानकाबाहेर खाद्यपदार्थ सहज उपलब्ध होते. त्यामुळे गर्दीच्या रेल्वे स्थानकांतील फलाटांवरील गर्दी व्यवस्थापनासाठी मध्य रेल्वेकडून खाद्यपदार्थांचे स्टॉल हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कुर्ला, कल्याण, डोंबिवली आणि वडाळा रोड रेल्वे स्थानकांवरील खाद्यपदार्थ स्टॉल हटवण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे.

तसेच दादर, ठाणे आणि घाटकोपर स्थानकांतील फलाटांवरील स्टॉल हटवण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. स्टॉलधारकांना स्थानकाच्या प्रवेशद्वारालगत रेल्वे हद्दीत पर्यायी जागा देण्याचे नियोजन आहे. त्याचबरोबर स्टॉलधारकांच्या पसंतीनुसार स्थानक परिसरातील रेल्वेच्या जागेतील अन्य ठिकाणी त्यांचे स्थलांतर करण्याचे नियोजन आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT