Railway sakal
मुंबई

Railway News: आता रेल्वेचा स्पिड होणार अजूनच सुपरफास्ट; घेतला महत्वाचा निर्णय!

बडनेरा ते चांदूर बाजार मार्गावर १०० किमी प्रतितास ते ११० किमी प्रतितास पर्यंत वाढविला आहे. तर नागपूर विभागात माजरी ते पिंपळखुटी दरम्यान ५० किमी प्रतितास ते ९० किमी प्रतितास तसेच ९० किमी प्रतितास पासून ११० किमी प्रतितास वेग वाढविण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Railway: अलीकडेच मध्य रेल्वेने इगतपुरी-भुसावळ-बडनेरा विभागामधील ५२६.७६ किलोमीटर रेल्वे मार्गाच्या सक्षमीकरण आणि पायाभूत सुविधा अद्यावत केल्यामुळे मेल- एक्सप्रेसच्या वेग वाढला आहे. आता मध्य रेल्वेने पुणे,भुसावळ आणि नागपुर विभागातील मल्टीट्रॅकिंग,ओव्हर हेड इक्विपमेंट रेग्युलेशन आणि सिग्नलिंगच्या कामावर मध्य रेल्वेने भर दिला आहे. त्यामुळे या तिन्ही विभागातील मेल-एक्सप्रेसचा वेग वाढणार आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, भुसावळ विभागात गाड्यांच्या कमाल अनुज्ञेय वेगात (एमपीएस) मध्ये वाढ करण्यात आली आहे. जलंब ते खामगाव दरम्यान ५० किमी प्रति तास ते ९० किमी प्रतितास पर्यंत,बडनेरा ते अमरावती दरम्यान ६५ किमी प्रतितास ते ९० किमी प्रतितास पर्यंत,बडनेरा ते चांदूर बाजार मार्गावर १०० किमी प्रतितास ते ११० किमी प्रतितास पर्यंत वाढविला आहे. तर नागपूर विभागात माजरी ते पिंपळखुटी दरम्यान ५० किमी प्रतितास ते ९० किमी प्रतितास तसेच ९० किमी प्रतितास पासून ११० किमी प्रतितास वेग वाढविण्यात आला आहे.(Latest Marathi News)

नरखेड ते कोहली दरम्यान (इटारसी ते नागपूर ३री मार्गिका),सिंदी ते बोटी बुरी दरम्यान (नागपूर ते सेवाग्राम तिसरी आणि चौथी मार्गिका) व चितोडा ते हिंगणघाट दरम्यान (सेवाग्राम ते बल्लारशाह तिसऱ्या मार्गिका) तसेच बोटी बुरी ते खापरी दरम्यान (नागपूर ते सेवाग्राम तिसरी आणि चौथी मार्गिका) वर ८० किमी प्रतितास ते ११० किमी प्रतितास पर्यंत आणि परासिया ते छिंदवाडा दरम्यान ५० किमी प्रतितास ते ११० किमी प्रतितास पर्यंत वेग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरील गाड्यांचा वेग वाढणार आहे. (Latest Marathi News)

पुणे विभागात पुणे ते सातारा दरम्यान १०० किमी प्रतितास ते ११० किमी प्रतितास,सातारा ते मिरज दरम्यान आणि मिरज ते कोल्हापूर दरम्यान १०० किमी प्रतितास ते ११० किमी प्रतितास पर्यंत वेगमर्यादा वाढविली आहे. यामुळे मुंबई ते कोल्हापूर दरम्यानच्या महालक्ष्मी,कोयना एक्सप्रेसचा वेग वाढण्यास मदत होईल. ( Marathi Railway News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update News : मान्सूनला अचानक ब्रेक ‘अल निनो’चा प्रभाव वाढला; शेतकऱ्यांसह सामान्य चिंतेत, राज्यात पाऊस पुन्हा कधी सक्रिय होणार?

Failed Student Scheme : नापास विद्यार्थ्यांसाठी सरकारचा मोठा दिलासा! जूनमध्ये अपयश आल्यास डिसेंबरमध्ये मिळणार आणखी एक संधी

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : ११ जुलै २०२६ ते १७ जुलै २०२६ - मराठी राशी भविष्य

UP : मुख्यमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या नियमांत बदल; अॅसिड हल्ल्यातील पीडितांचाही समावेश, अर्ज कसा करायचा?

निवडणूक कार्यक्रम जाहीर! सोलापूर बार असोसिएशनसाठी 4 ऑगस्टला मतदान; वकिलांना अर्ज घ्यायला अन्‌ भरायला 2 दिवसांची मुदत, ‘हे’ आहेत निवडणुकीसाठी इच्छुक

SCROLL FOR NEXT