Mumbai Rain: sakal
मुंबई

Mumbai Rain: मुंबईकरांनो घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा, हवामान विभागाने दिला इशारा

Mumbai Weather News : पुढील 3-4 तास मुंबईत जोरदार पाऊस बरसण्याची अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे

Chinmay Jagtap

Mumbai Heavy Rain: जून महीन्याच्या पहिला आठवड्यात पाऊस न पडल्यामुळे मुंबईकर चांगलेच निराश झाले होते. मात्र आज (रविवार) पहाटे पासून संपुर्ण मुंबईत पाऊस सुरू झाल्याने मुंबईकर एकदमच खूश झाले आहेत. ज्या पावसाची सर्वच लोक आतुरतेने वाट पाहत होते त्या पावसाला मुंबईत सुरुवात झाली आहे.

मुंबई,ठाणे, कल्याण, कर्जत, कसारा भागात पहाटे पावसाच्या सरी बरसल्या. येत्या काही काळात मुंबई, ठाण्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

पुढील 3-4 तास मुंबईत जोरदार पाऊस बरसण्याची अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरात मध्य आणि मोठ्या सरी बरसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

यावेळी तशी ४०-५० किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज असून विजेच्या कडकडाटसह पावसाचा अंदाज विभागाने वर्तवला आहे.याच बरोबर घराबाहेर पडताना काळजी घेण्याच हवामान खात्याचे आवाहन

याच बरोबर उत्तर कोंकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांतील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.पुढील काही तासांमध्ये मुंबईसह उपनगर, पालघर, अहमदनगर, नाशिक, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांनाही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Pump Business: पेट्रोल पंप मालकाला नेमका किती नफा होतो? पाहा दिवसाचं आणि महिन्याचं संपूर्ण गणित

Koyna Dam Water Storage Update : कोयना धरण 100 टीएमसी पार! तरीही नदीत विसर्ग का नाही? धरण व्यवस्थापनाचा मोठा निर्णय, महाबळेश्वरची स्थिती काय?

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

Marathi News Live Updates : विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी अमित ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

SCROLL FOR NEXT