मुंबई

सलग दुसऱ्या दिवशी मुंबईसह उपनगरात पावसाची जोरदार एन्ट्री

पूजा विचारे

मुंबईः मुंबईत आज सकाळपासूनच पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. नरिमन पॉईंट, वरळी, परेल, प्रभादेवी, दादर, सायन परिसरात पावसाचा जोर कायम आहे. मुलुंड, घाटकोपर, भांडुप, कुर्ला, अंधेरी, गोरेगाव, मालाड परिसरात पाऊस पहाटेपासूनच मुसळधार पाऊस सुरु आहे. दादर, हिंदमाता, किंग्ज सर्कल परिसरात पावसाची रिपरिप सुरू असल्याने पाणी भरण्यास सुरूवात झाली आहे. हिंदमाता परिसरात सलग दुसऱ्या दिवशी पाणी साचलं आहे.  सखल भाग असल्याने इथे गुडघ्यापर्यंत पाणी साचलं असून रस्त्यांना नदीचं स्वरुप आलंय. 

येत्या २४ तासात मुंबई आणि परिसरात काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह जोरदार पाऊस असेल. तसंच पुढील 48 तासात मुंबई, ठाण्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान खात्यानं (IMD), ठाणे आणि मुंबईसह महाराष्ट्रातील विविध भागात मुसळधार पावसाचे संकेत दिले असून अनेक ठिकाणी अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणे, पुण्यासह १ ऑगस्टपासून कोकणात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

मुंबईसह राज्यभरात हवामान खात्यने येत्या २४ तासात पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार २८ जुलैच्या पहाटेपासूनच मुंबई, ठाणे, नवीमुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान खात्यानं सादर केलेल्या बुलेटिनमध्ये आज मध्य महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी किमान पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर उद्या आणि आगामी काळात पावसाचा जोर वाढणार असल्याचं सांगण्यात आलंय. 

यासोबतच मुंबईच्या समुद्रात आज संध्याकाळी भरतीची शक्यताही वर्तवण्यात आलीय. हवामाना विभागाच्या माहितीनुसार, संध्याकाळी 5.53 वाजता भरतीची वेळ असून यावेळी समुद्रात 3.71 मीटरपर्यंत उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. तसंच आज दिवसभर मुंबईत पावसाची हजेरी राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलाय.

Rain Update Mumbai suburbs rainfall heavy rain second day

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Income Tax: 1 एप्रिलपासून नवा Income Tax नियम! पगार, घर-गाडी, गिफ्ट, PF वर आता आकारला जाणार कर; जाणून घ्या 7 मोठे बदल

Latest Marathi News Live Update : झोजी ला खिंडीत जोरदार हिमवृष्टी

Tejaswini Sangale Death : सुवर्णपदक विजेती खेळाडू मृत्यूशी झुंज हारली! राष्ट्रीय खो-खो पटू तेजस्विनी सनगलेचे वयाच्या 18 व्या वर्षी निधन, अपघातात मेंदूला...

Solapur LPG Misuse: साेलापूरात घरगुती गॅस वापरणाऱ्या व्यावसायिकांवर गुन्हे; अन्नधान्य वितरण विभागाचे छापे, हॉटेल व्यावसायिक रडारवर!

USA Drone Threat: अमेरिकेच्या मंत्र्यांच्या घरावर ड्रोन; लष्करी तळावर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, 'एफबीआय’चा काय इशारा!

SCROLL FOR NEXT