Ratan Tata Sakal
मुंबई

Ratan Tata: रतन टाटांची सुरक्षा वाढवा नाहीतर त्यांचा सायरस मिस्त्री होईल; मुंबई पोलिसांना धमकीचा फोन

Sandip Kapde

Ratan Tata: मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममध्ये येणारे धमक्यांचे फोन सुरुच आहे. बड्या उद्योगपतींना सतत धमक्या येत आहेत. यापूर्वी मुकेश अंबानी यांनी धमकी आली होती. आता रतन टाटा यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे.

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांनी जीवे मारण्याची धमकी आली आहे. मुंबई कंट्रोल रुमला धमकीचा फोन आला आहे. रतन टाटा यांची सुरक्षा वाढवा नाहीतर त्यांचा देखील सायरस मिस्त्री होईल, असं धमकी देणाऱ्या व्यक्तीने फोनवर म्हटले आहे.

दरम्यान धमकी देणारा व्यक्ती मनोरुग्ण असल्याचं समोर आलं आहे.

यापूर्वी रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांना अनेक धमकीचे ईमेल पाठवल्याप्रकरणी तेलंगणामधून एका आरोपीला अटक करण्यात आली होती. गणेश रमेश वनपर्धी असे आरोपीचे नाव असल्याचे गावदेवी पोलिसांनी सांगितले होते. न्यायालयाने त्याला ८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.

मुकेश अंबानी यांनाही 4 नोव्हेंबर रोजी जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. आरोपींनी 400 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी 31 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर दरम्यान दोन धमकीचे ईमेल पाठवले आणि दुर्लक्ष केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला होता. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

Marathi News Live Updates : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला भोर तालुक्यात होणारा संभाव्य अनर्थ भोर पोलिसांनी टाळला

IND vs SL: देवदत्त पडिक्कलचे स्वातंत्र्यदिनी ऐतिहासिक शतक, ८० वर्षात कोणालाही न जमलेला केला पराक्रम! पहिल्या दिवशी भारताचे वर्चस्व

Skincare Tips: चेहऱ्यासाठी प्रत्येक वेळी घरगुती उपाय नसतात फायदेशीर! जाणून घ्या त्वचातज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला...

SCROLL FOR NEXT