Railway News sakal
मुंबई

Railway News: प्रवाशांना मोठा दिलासा: मुंबईहून सुटणार २२ अतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या

या गाड्यांचे आरक्षण १८ एप्रिल रोजी भारतीय रेल्वेच्या सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Mumbai Railway News: प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस (Lokmanya Tilak Terminus) आणि सुभेदार गंज (प्रयागराज) दरम्यान २२ अतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वे सेवा चालवण्याच्या निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे मुंबई ते प्रयागराज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.(Indian Railway News)

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक ०४११६ साप्ताहिक उन्हाळी विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १९ एप्रिल ते २८ जूनपर्यंत दर शुक्रवारी रात्री ८.१५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ५.१० वाजता सुभेदारगंज येथे पोहोचेल.(Central Railway)

ट्रेन क्रमांक ०४११५ साप्ताहिक विशेष सुभेदारगंज येथून १८ एप्रिल ते २७ जूनपर्यंत दर गुरुवारी सकाळी ११.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ४.१५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

या दोन्ही रेल्वे गाड्या ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक, भुसावळ, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, चित्रकुट धाम, बांदा, रागौल, भरवा सुमेरपूर, कानपूर सेंट्रल आणि फतेहपूर स्थानकात थांबणार आहे. या गाड्यांचे आरक्षण १८ एप्रिल रोजी भारतीय रेल्वेच्या सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू होणार आहे.(Thane, Kalyan, Igatpuri, Nashik, Bhusawal, Itarsi, Piparia, Jabalpur, Katni, Maihar, Satna, Chitrakut Dham, Banda, Ragaul, Bharwa Sumerpur, Kanpur Central and Fatehpur)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Maratha Reservation: १९९४ चा जीआर नेमका काय आहे? मराठा समाज आरक्षणाबाहेर राहिला, कारण...

Latest Marathi News Updates: भाजपमध्ये घराणेशाही नाही- देवेंद्र फडणवीस

Pachod News : चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या धमकीने घाबरलेल्या शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन संपविले जीवन

कोकणातलं तुम्हाला काय आवडलं? दिलीप प्रभावळकर म्हणाले, 'ते पाहून मीच चकीत झालो कारण...

SCROLL FOR NEXT