Teacher Suman Randive Passed Away
Teacher Suman Randive Passed Away esakal
मुंबई

CM उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या शिक्षिकेचं निधन

संदीप पंडित

सुमन रणदिवे यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी जगाचा अखेरचा निरोप घेतला.

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या शिक्षिका सुमन रणदिवे (Suman Ranadive) यांचं काल (रविवार) रात्री निधन झालं. वयाच्या ९२ व्या वर्षी सुमन रणदिवे यांनी जगाचा अखेरचा निरोप घेतलाय. मागील अनेक महिन्यांपासून त्या सफाळा येथील न्यू लाइफ फाऊंडेशनमधील वृद्धाश्रमात राहत होत्या.

दादरच्या बालमोहन विद्यालयात त्या शिक्षिका म्हणूनही कार्यरत होत्या. बालमोहन विद्यामंदिरात (Balmohan Vidyamandir) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यासह अनेक राजकारण्यांना शिकवणाऱ्या सुमन लक्ष्मण रणदिवे यांनी रविवारी रात्री वसईतील वृद्धाश्रमात अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी त्या अचानक आजारी पडल्या होत्या. त्यांनी शेवटचा श्वास घेण्याच्या काही तास आधी काहीही खाल्लं नव्हतं. तसेच डॉक्टर येण्यापूर्वीच रात्री 8:30 वाजता त्या आम्हाला कायमच्या सोडून गेल्या, असं न्यू लाईफ फाऊंडेशनच्या सरिता मोरो (Sarita Moro) यांनी सांगितलं.

मागील वर्षात तौत्के चक्रीवादळचा पश्चिम किनारपट्टीला जोरदार तडाखा बसला होता. यात समुद्र किनाऱ्याजवळ मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. वसई येथील वृद्धाश्रमालाही वादळाचा फटका बसला. न्यू लाइफ फाऊंडेशनच्या पहिल्या मजल्यावरील खिडकीचा दरवाजा कोसळून एक वृद्ध नागरिक जखमी देखील झाले होते. त्यानंतर शिक्षिका सुमन रणदिवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मदत मागितली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: लखनौला बसला दुसरा धक्का, कर्णधार केएल राहुलला हर्षित राणाने धाडलं माघारी

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT