मुंबई

आदिवासी महिलांनी तयार केलेल्या आकाश कंदिलांनी उजळणार राजभवन

भाग्यश्री भुवड

मुंबई : या दिवाळीत राज्यपालांचे निवासस्थान असलेला राजभवन परिसर पालघर जिल्ह्यातील आदिवासी महिलांनी तयार केलेल्या आकाश कंदिलांनी उजळणार आहे स्थानिक स्वदेशी उत्पादनांना मदत करण्याच्या हेतूने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवनातील सर्व कर्मचाऱ्यांना दीपावलीनिमित्त मिठाईसह आदिवासी महिलांनी तयार केलेले व बांबूपासून तयार केलेले पर्यावरण-स्नेही आकाश कंदील भेट दिले.

“राजभवनात राज्यपाल येत असतात व जात असतात परंतु येथील स्थायी कर्मचारी मात्र येथेच राहत असतात. त्यामुळे राजभवन सुंदर व स्वच्छ ठेवण्याची तसेच चांगली शासकीय सेवा करण्याची जबाबदारी सर्वांची आहे”, असे राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना सांगितले. 

या वर्षी फेब्रुवारी महिन्यात राज्यपालांनी पालघर जिल्ह्यातील भालिवली येथील विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटरच्या बांबू प्रकल्पाला भेट दिली होती. त्या ठिकाणी बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या आदिवासी महिलांना त्यांनी प्रमाणपत्रे दिली होती. अधिकाधिक लोकांनी आदिवासी बांधवांनी तयार केलेली उत्पादने विकत घ्यावी अशी सूचना करताना आपण राजभवनापासून याची सुरुवात करू असे कोश्यारी यांनी सांगितले होते.

त्यानुसार राज्यपालांनी विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटरला आकाश कंदील पुरवण्याचे सूचित केले. केंद्राच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील भालिवली, बोट, दुर्वेश व गोजे येथील आदिवासी महिलांनी ही कंदील तयार करून राजभवन येथे पाठविले व आज राज्यपालांनी आपल्या कर्मचारी व पोलीस जवानांना ते दिवाळीनिमित्त भेट दिले. करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा दिवाळी सुरक्षित, पर्यावरणपूरक व प्रदुषणरहित साजरी करावी अशी सूचना राज्यपालांनी केली.

Raj Bhavan will be lit by lanterns made by tribal women

-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Family Pension Rules: मोठी बातमी! केंद्र सरकारकडून कुटुंब पेन्शनसाठी नवीन नियम जारी, आता मुलांना वडिलांची पेन्शन कधी मिळणार? वाचा...

'सर... माझं ब्रेकअप झालय' Gen Z कर्मचाऱ्याने बॉसला पाठवला मेल, बॉसला दया आली आणि १० दिवसांची सुट्टी मंजूर झाली

Latest Marathi News Live Update : राष्ट्रवादी शरद पवार पक्ष रायगड जिल्हा परिषदेच्या सर्व ५९ जागांवर निवडणूक लढवणार

Doctor Death Case: हत्या की आत्महत्या? एका वेलांटीवरुन डॉक्टर युवतीचं मृत्यू प्रकरण उलगडण्याची शक्यता

Share Market Closing : सेन्सेक्स 369 अंकांनी वधारला; निफ्टी निर्देशांक 26,000 वर, 'या' शेअर्सने दिले सर्वाधिक परतावे

SCROLL FOR NEXT